जेजुरी : कुंभारवळण मंडल अधिकार्‍यांचा कर्तव्यात बेजबाबदारपणा

पोलीसनामा ऑनलाइन टीम – कुंभारवळण (ता. पुरंदर) येथील मंडल अधिकारी प्रभावती कोरे ह्या महिला अधिकारी असल्याने नागरिकांना व शेतकऱ्यांना त्रास देत आर्थिक देवाण-घेवाण केल्या शिवाय कोणत्याही नोंदी करत नसल्याची तक्रार ग्राहक संरक्षण समितीचे अध्यक्ष महेश राऊत यांनी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे केली होती. त्या अनुषंगाने उपविभागीय अधिकारी यांनी दप्तर तपासणीचे आदेश नायब तहसीलदार सुहास सोमा यांना दिले होते. त्यांच्या अहवालामध्ये कुंभारवळण मंडल अधिकारी हे कर्तव्यात कसूर करत असल्याचे निदर्शनास आले आहे. तसा अहवाल उपविभागीय अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केला आहे.

तहसीलदार सुहास सोमा यांनी दप्तर तपासणी दरम्यान या मंडल अधिकारी मुख्यालयाच्या ठिकाणी राहत नाहीत, मंडल अधिकारी यांनी ६ गठ्ठात दप्तर ठेवलेले नाही, मंडल अधिकारी यांनी पदभार स्वीकारल्या पासून ते दप्तर तपासणी पर्यंत कधीही तहसीलदार यांच्याकडे दैनंदिनी सादर केलेली नाही, मंडल अधिकारी यांना “अ” पत्रकाच्या वसुलीचे उद्दिष्ट रक्कम रुपये ८००६७२ इतके दिले होते परंतु त्याची वसुली ०% केलेली आहे, मंडल अधिकारी यांचे दप्तर माहे ऑगस्ट २०१८ पासून कार्यविवरण उपलब्ध झाली असून त्यात नमूद दप्तरी ४१ प्रकरणे प्रलंबित होती.

त्याचप्रमाणे कार्यविवरणा मध्ये नमूद ६ प्रकरणे दप्तरात आढळून आलेली नाहीत, मंडल अधिकारी यांच्याकडे तपासणीचे दिवशी डॅशबोर्ड प्रमाणे साध्या नोंदी २४७, वारस नोंदी ८७, तक्रारी नोंदी २३, अशा एकूण ३५७ नोंदी प्रलंबित दिसून आल्या. डॅशबोर्डला २३ तक्रारी नोंदी प्रलंबित दिसून येतात. परंतु तक्रार रजिस्टरला फक्त ११ नोंद प्रलंबित दिसून आल्या आहेत.

डॅशबोर्ड ला आढळून आलेल्या तक्रारी नोंदी पुढील प्रमाणे खळद फेरफार क्रमांक १४८५५, पारगाव ६८२७, खानवडी ६७६७, ६७६६, बेलसर ९१५५, ९२१० पिसर्वे ५४१५, ५४४३, सिंगापूर ३७२६, ३७२५, ३६६५ फक्त एवढेच फेरफार प्रलंबित दिसत आहेत. मंडलामध्ये सर्वात जुनी नोंद बेलसर येथील फेरफार नंबर ८७९५ ही तक्रार दिनांक ७/११/२०१७ पासून प्रलंबित आहे. यावरून मंडल अधिकारी हे कर्तव्यात कसूर करत असल्याचे नायब तहसीलदार सुहास सोमा यांनी म्हटले आहे. तर २५२ पानात संपूर्ण अहवाल परिशिष्ट २० राज्यातील शासकीय अधिकाऱ्यांना लिहिलेली सर्वसाधारण पत्रचा नमुना प्रकरण बारा परिशिष्ट १०२ (१) या खाली जिल्हाधिकारी यांच्या कडे दौंड पुरंदर चे उपविभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड यांनी सादर केला आहे.

कुंभारवळणच्या मंडल अधिकारी प्रभावती कोरे यांचे तात्काळ निलंबन करून त्यांच्याकडून गहाळ झालेले सहा तक्रारी केसची शोध घ्यावा. त्याचबरोबर प्रलंबित फेरफार तात्काळ मंजूर करण्यात यावेत व १२ फेरफार तक्रार पुस्तकात नोंदवलेले नाहीत ते नोंदवून घ्यावेत व मंडल अधिकाऱ्यांनी नामंजूर केलेल्या सर्व फेरफाराची पुन्हा चौकशी करावी.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/