खळद येथील अपघातात एक जागीच ठार

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन (संदीप झगडे) –  सासवड – जेजुरी या पालखी महामार्गावरील खळद (ता. पुरंदर) येथील अक्षय इंडस्ट्रीज समोर एक्स. यु. व्ही कार व दुचाकी यांच्यात जोरदार धडक होऊन दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे.

अक्षय इंडस्ट्रीज शेजारील ताथेवाडी कडे जाणारी दुचाकी क्रमांक एम. जे. जी. २४७२ वरून जात असताना हरिश्चंद्र रामचंद्र जगताप (वय ७४ रा. सासवड ताथेवाडी ) यांना पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या एक्स. यु. व्ही. या कार क्रमांक एम. एच. ४२ के ३१३१ या कार चालकाने जोरदार धडक दिल्याने जगताप यांचा जागीच मृत्यू झाला. तर कार चालक मात्र फरार झाला आहे. कार चालकावर सासवड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला असून याबाबत पुढील तपास सासवड पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल घुगे करीत आहेत.

सासवड नगरपालिकेचे नगरसेवक मोहन जगताप, रवींद्र जगताप व प्रकाश जगताप यांचे ते वडील होते.