राज्यमंत्र्याकडे निवेदनाद्वारे मागणी, जेजुरीतील शासकीय जागेतील बांधकाम कायम करा

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाईन (संदीप झगडे ) –  जेजुरी, तालुका-पुरंदर, जिल्हा-पुणे येथील गट क्रमांक १८९ (१) या शासकिय जागेतील वसलेल्या लक्ष्मीनगर येथील राहणाऱ्या नागरिकांची घरे कायम करा अशी मागणी रिपब्लिकन पक्षाने महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार अविनाशजी महातेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे प्रत्यक्ष भेटुन केली.
Avinash Mahatekar
रिपब्लिकन पार्टी आँफ इंडीया ए या पक्षाच्या वतीने जेजुरी येथील शासकीय जागेत वसलेल्या लक्ष्मीनगर येथील अनधिकृत बांधकामे कायम करा, अशी लेखी मागणी राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार अविनाशजी महातेकर यांची विधान भवन मुंबई येथे रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळाने प्रत्यक्ष भेट घेऊन लेखी निवेदन देऊन केली. रिपब्लिकन पक्षाचे जेष्ठ नेते माजी आमदार अ‍ॅड. एल. टी. सावंत, प्रदेश सचिव हरेशभाई देखणे, रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष सतिश केदारी यांच्या नेत्रुत्वाखाली रिपाइं शिष्टमंडळाने महातेकरसाहेब यांची भेट घेतली. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष पंढरीनाथदादा जाधव, रिपाइंचे पुरंदर तालुका पदवीधर आघाडीचे तालुका अध्यक्ष प्रितम आठवले, यांच्यासह जेजुरी येथील नागरीकांनी केलेल्या स्वाक्षरीचे निवेदन महातेकर साहेबांना देण्यात आले. यावेळी रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष तथा रिपाइंचे जिल्हा उपाध्यक्ष विष्णुदादा भोसले, पारधी आघाडीचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम पवार, रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे प्रदेश सचिव रविंद्र वालदे, अशोकराव गायकवाड, नानासाहेब शिंदे, राहुल गायकवाड इत्यादी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

जेजुरी येथील शासकिय जागेत जवळ जवळ शंभर कुटुंबांनी सदर ठिकाणी सन १९९१ पासुन पक्की घरांची बांधकाम करुन आर्थिक दुर्बल गटातील मागास प्रवर्गातील लोकांचे वास्तव्य लक्ष्मीनगर येथे असुन येथे राहणारांची संख्या किमान सहाशे ते साडे सहाशे इतकी असुन सदर कुुटंबे ही भूमिहिन असुन मोलमजुरी करुन आपला उदरनिर्वाह करतात. यांच्याकडे रेशनकार्ड, आधारकार्ड, मतदान ओळखपत्र हे रहिवासी पुरावे असुन त्यांना सन १९९५ पासुन घरगुती विज कनेक्शन दिलेली आहेत. जेजुरी नगरपालिका सदर रहिवाशी यांच्याकडुन पाणिपट्टीकर, इमारतकर सुध्दा घेते. सदर अतिक्रमण कायम करुन सि.टी. सर्वे रेकार्डला त्यांची मालक म्हणुन नोंद व्हावी याकरीता सदर रहिवाशी प्रशासनाचे सातत्याने उंबरटे झिजवुन सुध्दा प्रशासकिय अधिकारी याची दखल घेत नाहीत. शासकिय जागेतील अतिक्रमणे कायम करा, असे शासनाचे परिपत्रक असुनही संबंधित अधिकारी या बाबतचे अतिक्रमण कायम करणेबाबतचे प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवित नाहीत. त्यामुळे सदर ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना न्याय देण्यासाठी रिपब्लिकन पक्षाने हा प्रश्न सोडविण्यासाठी सदर निवेदन देऊन कामास सुरवात केली आहे.

Visit :- policenama.com

You might also like