जेजुरी पोलिसांकडून पोकलेन मशीनचे ब्रेकर चोरणारे गजाआड

जेजुरी (संदीप झगडे) : पोलीसनामा ऑनलाइन – जेजुरी पोलीस स्टेशनला दि . ०७/११/२०१९ रोजी वाघापूर चौफुला येथुन वाघापूर चौफुला ते उरूळी कांचन रोडचे कामासाठी असलेले पोकलेन मशिनचे दोन ब्रेकर चोरीस गेल्याने गुन्हा दाखल होता.

वरील गुन्ह्यातील चोरीस गेलेले ब्रेकर शोधण्यासाठी पोलीस हवालदार विरण्णा मुत्तनवार, पोलीस हवालदार सचिन पडयाळ, पोलीस नाईक अक्षय यादव, पोलीस नाईक गणेश कुतवळ, पोलीस शिपाई महेश उगले, पोलीस शिपाई प्रविण शेंडे, पोलीस मित्र नाना घोगरे यांचे पथक तयार करून गुन्ह्याचे तपास कामी पाठविले होते. गुन्ह्याचा तपास करत असताना पथकास गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाल्याने रेकॉर्ड वरील गुन्हेगार कैलास उर्फ आप्पा भरत जगताप, रा. राजेवाडी, ता. पुरंदर, जि. पुणे यास ताब्यात घेऊन सदर गुन्ह्याचे बाबत तपास केला असता, सदर गुन्हा हा त्याने व त्याचा साथीदार रेकॉर्डवरील गुन्हेगार सुखदेव सुरेश कुजीर, रा. वाघापूर व लल्या रणजित राठोड रा. राजेवाडी, जीवन अनंता कांबळे, रा. गुऱ्होळी यांचे मदतीने केल्याचे कबूल केले. सदर गुन्ह्यातील कैलास उर्फ आप्पा भरत जगताप व जीवन अनंता कांबळे यांना अटक केलेले असून त्यांचेकडून एक ब्रेकर व गुन्ह्यात वापरलेली पिकअप जप्त केलेली आहे उर्वरीत आरोपी फरार आहेत.

सदरचा तपास संदिप पाटील, पोलीस अधिक्षक,  जयंत मिना, अपर पोलीस अधिक्षक बारामती विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली व अण्णासाहेब जाधव उपविभागीय पोलीस अधिकारी, भोर विभाग, सासवड यांचे सुचनेनुसार सदरची कारवाई करणेत आलेली आहे.

Visit : Policenama.com