१४ घरफोड्या करणारा आरोपी जेजुरी पोलीसांकडून जेरबंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – जेजुरी पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार सतीश बाळासाहेब चव्हाण (रा. गुळुंचे) हा निरा परिसरात येणार आहे अशी माहिती मिळताच, त्यास सापळा लावून ताब्यात घेण्यात आले. तो खालील पोलीस स्टेशन मधील गुन्ह्यांमध्ये फरारी होता.

१) पुणे ग्रामीणचे सासवड पोलीस स्टेशनला एका गुन्ह्यात व बारामती तालुका पोलीस स्टेशनला दोन गुन्ह्यांत

२) कोल्हापूर मधील शाहूपुरी पोलीस स्टेशनला दोन गुन्ह्यांत

३) सांगलीतील विश्रामबाग पोलीस स्टेशनला एका गुन्ह्यात

४) साताऱ्यातील कराड शहर, फलटण, शिरवळ या तिन्ही पोलीस स्टेशनला एक-एका गुन्ह्यात

५) रत्नागिरीतील चिपळूण पोलीस स्टेशनला दोन गुन्ह्यात

६) रायगड मधील महाड MIDC पोलीस स्टेशनला एका गुन्ह्यात

७) पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील चाकण पोलीस स्टेशनला एका गुन्ह्यात

८) पुणे शहर मधील सिंहगड रोड पोलीस स्टेशनला एका गुन्ह्यात

सदर आरोपी हा वरील ठिकाणी एकूण १४ घरफोड्या करून फरार होता. त्यास पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील, बारामती विभागाचे अपर पोलीस अधीक्षक जयंत मीना यांचे मार्गदर्शनाखाली व उपविभागीय पोलीस अधिकारी भोर विभाग अण्णासाहेब जाधव यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे जेजुरी पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक अंकुश माने, पोलीस उपनिरीक्षक विजय वाघमारे, सहा. पोलीस उपनिरीक्षक सुरेश गायकवाड, बाळासाहेब बनकर, पोलीस हवालदार गोविंद भोसले, पोलीस नाईक विनोद हाके, पोलीस शिपाई निलेश जाधव यांनी निरा परिसरात सापळा रचून पकडले व त्यास पुढील तपासकामी सासवड पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले.

आरोग्यविषयक वृत्त –