पुरंदर तालुक्यातील नाभिक समाजाकडून दि 9 रोजी आंदोलनाचा इशारा

जेजुरी : कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुभावामुळे राज्यातील सलून व्यवसाय दि 23 मार्च पासून बंद आहेत.त्यामुळे नाभिक समाजावर उपासमारीची वेळ आली आहे,असे असतानाही शासनास सहकार्य करून समाज बांधवांनी आपली दुकाने बंद ठेवली आहेत. एकतर दुकाने उघडण्यास शासनाने परवानगी द्यावी अन्यथा दरमहा आर्थिक मदत करावी हि मागणी केली होती.मात्र शासनाने त्याकडे दुर्लक्ष केले असून दि. 8 जून रोजी शासनाने याबाबत निर्णय न घेतल्यास दि. 9 जून रोजी आंदोलनाचा इशारा पुरंदर तालुका नाभिक महामंडळाने दिला आहे.

या मागणी बाबत राज्यसंघटनेने 20 एप्रिल रोजी शासनाला पत्र दिले होते, 5 जूनला हि स्मरण पत्र देण्यात आले आहे मात्र शासनाने त्याकडे लक्ष दिले नाही. दि. 8 रोजी शासनाने निर्णय न घेतल्यास दि. 9 जून रोजी तहसीलदार कार्यलया समोर सलून साहित्य धोपटी घेऊन आंदोलन करणार असल्याचे पुरंदर नाभिक महामंडळाचे अध्यक्ष राहुल मगर, कार्याध्यक्ष भारत मोरे, उपाध्यक्ष सुशील गायकवाड,सागर विभाड, सचिव तुकाराम भागवत यांनी सांगितले.