प्रजासत्ताक दिनानिमित्ताने बारा बलुतेदार विकास संघ जेजुरी यांच्याकडून शालेय मुलांना मोफत गणवेश वाटप

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन (संदीप झगडे) – जेजुरी येथील जिल्हा परिषद मराठी शाळेतील अत्यंत गरीब परिस्थितीत शिक्षण घेत असलेल्या गरीब विद्यार्थ्यांना शाळेच्या प्राचार्यां सौ. संगिता वाघुलिकर, शिक्षिका सौ. मिरा कानडे, सौ. कुसूम कामठे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रजासत्ताक दिनानिमित्ताने बारा बलुतेदार विकास संघाच्या वतीने स्व: खर्चातुन शालेय मुलांना गणवेश, बुट आणि साॅक्स व खाऊचे वाटप करून सर्व विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.

तसेच पुणे जिल्ह्याचे धर्मदाय आयुक्त दिलीप देशमुखसाहेब याच्यांशी संपर्क साधला असता त्यांनीही या अत्यंत हालाखिच्या परिस्थितीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दररोज दुपारी 1 ते 2 या वेळेत जेवणाची सोय केली. संघटनेच्या व शाळेच्या वतीने त्यांचेही हार्दिक आभार मानले.

यावेळी संघटनेचे अध्यक्ष सचिन खोमणे, उपाअध्यक्ष नागनाथ झगडे, सचिव तुषार कुंभार, कार्याध्यक्ष विठ्ठल सोणवने, सहसचिव आनंद गोलांडे तसेच पदाधिकारी गणेश लांघी, संजय रहाटेकर यशवंत भालेराव, रामदास राऊत, रज्जाक तांबोळी, माणिक पवार, दिलीप गायकवाड, अजिंक्य बारभाई उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे आयोजन संघटनेचे गणेश लांघी व तुषार कुंभार यांनी केले तर, आभार विठ्ठल सोणवने यांनी मानले.

फेसबुक पेज लाईक करा –