जेजुरीत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश ! दोघांना अटक, 2 पीडित मुलींची सुटका

पोलीसनामा ऑनलाइन टीम – जेजुरीत मध्यवस्तीत चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करत जेजुरी पोलिसांना दोघांना अटक केली आहे. तर दोन पिडीत मुलींची सुटका केली आहे. या प्रकरणी अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम कलमानुसार जेजुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
संकेत गावडे (रा. गुनवडी, जि. सातारा) आणि ऋषिकेश घाडगे (रा. जेजुरी) असे अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. जेजुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील मध्यवस्तीत वेश्या व्यवसाय चालत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सुनील महाडिक यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून मुंबईतून आणलेल्या दोन पीडित मुलींची सुटका केली. पीडित मुलींना फलटण येथे दलालाकडे पाठवण्यात येणार होते, अशी माहिती मिळाली. जेजुरीत कुठेही वेश्याव्यवसाय चालू असल्याची माहिती कोणाला मिळाल्यास त्यांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.