जेजुरी : कोथळे येथे सॅनिटरी पॅड व मास्कचे वाटप

जेजुुुरी (संदीप झगडे) : पोलीसनामा ऑनलाइन –   पुणे जिल्हा भाजपचे नेते बाबाराजे जाधवराव मित्र परिवार व पुणे जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य प्रकाश भोईटे यांच्या पुढाकारातून कोथळे येथे महिलांसाठी 200 सॅनिटरी पॅड व शेतकरी वर्गासाठी 500 मास्क चे वाटप करण्यात आले.

कोरोना चा शिरकाव पुरंदर तालुक्यात झाल्यामुळे पुरंदर मधील शहरी भागा बरोबरच ग्रामीण भागात भीतीचे वातावरण आहे. अशातच घरातून बाहेर पडणे अवघड झाले आहे.ग्रामीण भागात मास्क नसल्याने लोक तोंडाला रुमाल बांधत होते. जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य प्रकाश भोईटे माध्यमातून मास्क तसेच सेनेटरी पॅड उपलब्ध करून देण्यात आले व त्यांचे वाटप करण्यात आले . सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय भोईटे, संदिप जगताप, अभिजित जगताप,आकाश शिळीमकर, रामचंद्र जगताप, शिवाजी भोईटे, सोमनाथ राऊत, मारुती जगताप, भरत जगताप,अभिजित भोईटे,गणेश थोरात आदी यावेळी उपस्थित होते . तसेच आशा सेविका मनीषा शिर्के यांनी सॅनिटरी पॅड चे वाटप किशोरवयीन मुली व महिलांना केले.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like