जेजुरी : पुरंदरच्या शिक्षण विभागाकडून प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी थर्मोमीटरचे वाटप

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना लढ्यात ‘कोविड योद्धा”म्हणून महत्वाची भूमिका पार पाडणारे प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांना प्राथमिक आरोग्य केंद्रात येणाऱ्या रुग्णांची तपासणी करण्यासाठी ज्वरमापक(थर्मोमीटर) यंत्राची गरज असल्याचे लक्षात घेऊन पुरंदरचे गटशिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांच्या आवाहन व मार्गदर्शनानुसार पुरंदरमधील प्राथमिक,सेवानिवॄत्त शिक्षकांनी निधी संकलित करून पाच ज्वरमापक(इनफ्रारेड थर्मोमीटर) उपलब्ध करून दिले.

त्यांचे वितरण पुरंदर-हवेलीचे आमदार संजय जगताप, पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजीत शिवतरे,पुणे जिल्हा परिषद बांधकाम समितीचे सभापती प्रमोद काकडे, पुरंदरच्या सभापती नलीनी लोळे, उपसभापती प्राध्यापक गोरक्षनाथ माने,गटविकास अधिकारी मिलिंद टोणपे, गटशिक्षणाधिकारी मोहन गायकवाड,जिल्हा परिषद सदस्य दत्ता झुरंगे, शालिनी पवार,पंचायत समिती सदस्य अतुल म्हस्के, सुनिता कोलते, सोनाली यादव, पुरंदरमधील सर्वच प्राथमिक शिक्षक संघटनेचे प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत ५ प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांकडे करण्यात आले. या उल्लेखनीय मदत व कार्याबद्दल पुरंदर मधील सर्व शिक्षकांचा व उपक्रमशील शिक्षण विभागाचा निश्चितच अभिमान वाटतो.असे गौरवोद्गार आमदार संजय जगताप यांनी काढले. सर्व डॉक्टरांनीही थर्मोमीटर ही सध्या अत्यावश्यक बाब होती व ती पूर्ण झालेने आमची सेवा सुलभ होईल असे सांगून शिक्षण विभागाला धन्यवाद देत समाधान व्यक्त केले .

यापूर्वी माध्यमिक शिक्षकांच्या सहकार्याने कोविड सेंटर,सासवड,जेजुरी ग्रामीण रुग्णालय व तालुका आरोग्य अधिकारी यांनाही 5 थर्मोमीटर देण्यात आले आहेत. यापूर्वीही पुरंदर मधील प्राथमिक शिक्षकांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला सुमारे बारा लक्ष रुपयांचा मदतनिधी दिला.तसेच प्राथमिक, माध्यमिक व सेवानिवृत्त शिक्षकांनी कोरोनाच्या संकटकालीन परिस्थितीमध्ये पुरंधरमध्ये भरीव निधी गोळा केला. त्यामध्ये गोरगरीब व गरजू व्यक्तींना सुमारे १००० किराणा साहित्याचे किट वाटप, वृद्धाश्रमातील वृद्धांना मदत,जेजुरी येथील निराधार गरजू व्यक्तींना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप ,आमदार संजय जगताप यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या आनंदी थाळीसाठी वस्तूरुपाने मदत ,पोलिस व कोविड योद्धयांना मास्क, सॅनिटायझर, पाणीवाटप तसेच कोरोना संकटकाळात रेशन धान्य दुकानावर, चेक पोस्टवर, क्वारंटाईन केलेल्या ठिकाणी निरीक्षक म्हणून,रुग्ण सापडलेल्या गावांतील सर्वेक्षण अशी प्रशासनाने नेमून दिलेली कामेही पुरंदरमधील सर्वच शिक्षकांनी प्रामाणिकपणे केली आहेत.

यावेळी शिक्षक प्रतिनिधी गणेश लवांडे, श्रीधर वाघोले,संदीप कदम,श्याम मेमाणे,मनोज सटाले,शाग्रुंधर कुंभार, नंदकुमार चव्हाण, विजय वाघमारे गटसमन्वयक संजय चव्हाण,केंद्रप्रमुख राजेंद्र जगताप,राजेंद्र कुंजीर,अनिल जगदाळे ,विषयतज्ज्ञ दीपक पाटील आदि उपस्थित होते.