धक्कादायक ! वयोवृध्दाची जेजुरीत गळफास घेऊन आत्महत्या

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन (संदीप झगडे) – जेजुरी पोलिस स्टेशन कडुन मिळालेल्या माहितीनुसार जेजुरी येथे अक्षय मिसळ हाऊसच्या समोर तनाज घरसंसार सेल्स या दुकानाचे बंद शटरच्या पत्र्याच्या शेडच्या अँगल ला अनोळखी पुरुष जातीचे अंदाजे ८० वयाच्या इसमाने धोतराने फाशी घेतल्याची खळबळ जनक घटना समोर आली.

अजय यशवंत पवार, रा. लक्ष्मीनगर, जेजुरी यांनी खबर दिल्याने जेजुरी पोलिस स्टेशन अकस्मात मयत रजिस्टर नंबर ०१/२०, सी.आर. पी. सी. १७४ प्रमाणे आज दि. १८/०१/२०२० रोजी दाखल आहे. सदर मयत ईसम अनोळखी आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/