जेजुरी मध्ये 26 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन – पुरंदर तालुक्यातील जेजुरी हद्दीतील दवणेमळा रोड येथे एका २६ वर्षीय तरुणाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली असून, ही घटना आज सकाळी उघडकीस आली. तरुणाच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून, तो लोन वाटप आणि वसुलीचे काम करत होता.

रोहित जगन्नाथ कारंडे, वय २६ वर्ष असे मृत तरुणाचे नाव असून, हा तरुण बलवाडी, ता. सांगोला, जि. सोलापूर या मूळ गावाचा सध्या कामानिमित्त तो जेजुरी हद्दीतील दवणेमळा रोड लगत भाडोत्री म्हणून राहायला होता. काल सुट्टी असल्याने तो दिवसभर रूमवर एकटाच होता. त्याच्या रूम मधील इतर मुले गावी गेली असल्याने ती पहाटे सव्वा चार वाजता आल्यावर त्यांनी दरवाजा वाजवला असता, दरवाजा आतून उघडला न गेल्याने मुलांनी खिडकीतून आत डोकावून पाहिले असता सदरील तरुण रूमच्या स्लॅबचे हुकाला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला.

तपासणीअंती त्याला मृत घोषित करण्यात आल असून या प्रकरणी जेजुरी पोलिस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like