जेजुरी : प्लॅस्टिकबंदी व स्वच्छतेविषयी ‘शपथ’ !

जेजुरी ( संदीप झगडे ): पोलीसनामा ऑनलाइन – प्लॅस्टिकचे दुष्परिणाम टाळण्यासाठी व प्लॅस्टिकला पर्याय देण्यासाठी गांधी जयंतीपासून प्लॅस्टिक संकलन श्रमदान चळवळ राबविण्यात येणार आहे . जेजुरीच्या नागरिकांनी याबाबत प्रशासनाला सहकार्य करावे , असे आवाहन जेजुरी नगरपालिकेच्या मुख्याधिकारी पूनम कदम यांनी केले आहे .

चळवळीची जनजागृती करण्यासाठी मंगळवारी येथील जिजामाता इंग्लिश मीडियम स्कूल , शरदचंद्रजी पवार महाविद्यालय , जेजुरी नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातून रॅली काढण्यात आली होती . रॅलीत चौकाचौकांतून पथनाट्यांच्या माध्यमातून जागृती करण्यात आली. प्लॅस्टिकबंदी व स्वच्छतेविषयी शपथ घेण्यात आली .

गांधी जयंतीनिमित्त बुधवारी , २ ऑक्टोबर रोजीही अशाच प्रकारची भव्य रॅली काढण्यात येईल . शहरातील प्रमुख मार्गावरून ही रॅली जाणार आहे . हनुमान चौक , नंदी चौक , अहिल्यादेवी चौक , जानूबाई चौकातून ही रॅली जाणार असून चौकाचौकांत प्लॅस्टिकबंदी व स्वच्छतेची नागरिकांना शपथ देण्यात येणार आहे . रॅलीच्या मार्गात ठिकठिकाणी सर्व प्रकारचे प्लॅस्टिकही गोळा केले जाणार आहे .

राष्ट्रीय हित , भावी पिढीच्या शाश्वत विकासासाठी व प्रदूषणमुक्त पर्यावरणासाठी प्लॅस्टिकमुक्ती अत्यंत गरजेची आहे . शहरातील विविध सेवाभावी संस्था धार्मिक संस्था , बचत गट , शासकीय कार्यालये, महिला मंडळे , शाळा महाविद्यालये आदींनी या चळवळीत सहभागी व्हावे , असे आवाहन मुख्याधिकारी पूनम कदम यांनी केले आहे.

Visit : Policenama.com