जेजुरी : बस न थांबविल्याने मुला ने फोडल्या बसच्या काचा

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन ( संदीप झगडे ) – जेजुरीहून राखकडे जाणारी बस न थांबवल्याने एका अल्पवयीन मुलाने बस अडवून तिच्यावर दगडफेक केली. सोमवारी ( दि . ९ ) सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास एसटी बस ( एम एच १२ ई एफ६३३९ ) जेजुरीहून राख गावाकडे जात होती.

कोळविहिरे गावानजीक घाटेवस्ती येथे एका अल्पवयीन मुलाने बस थांबवली नाही म्हणून दुचाकी बसला आडवी लावून बस थांबवली. चालक अण्णासाहेब बाजीराव रणवरे यांना बस का थांबवली नाही असे म्हणत बसवर दगडफेक करुन बसच्या काचा फोडल्या.

सुदैवाने बसमधील कोणालाही दुखापत झाली नाही. चालक रणवरे यांनी जेजुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जेजरी पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला असून, अल्पवयीन आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे. बस अडवण्यासाठी वापरलेली दुचाकी ( एम एच १२ एस ए ७६७७ ) ही जप्त केली आहे. अल्पवयीन मुलाला वाहन चालवण्यास दिल्याबद्दल गाडी मालकावरही कारवाई करण्यात आली आहे.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like