Video : ‘जैश-ए-मोहम्मद’चा म्होरक्या मसूद अजहर ‘मरता-मरता’ वाचला ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जैश-ए-मोहम्मद चा म्होरक्या मसूद अजहर हा पाकिस्तानमधील एका बॉम्बस्फोटातून थोडक्यात बचावला असल्याची माहिती मिळत आहे. पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादच्या जवळ रावळपिंडी शहरातील लष्करी रुग्णालयात रविवारी संध्‍याकाळी भीषण बॉम्बस्फोट झाल्याची माहिती आहे.

याच रुग्णालयात जैश-ए-मोहम्मद चा म्होरक्या मसूद अजहर हा उपचार घेत होता. त्यामुळे या बॉम्बस्फोटात तो थोडक्यात बचावला असल्याचे सांगण्यात येत आहे. या हल्ल्यात १० जण गंभीर जखमी झाले आहेत.

एएनआयने क्वेट्टा मधील मानवाधिकार कार्यकर्ते एहसान-उल्लाह-मियाखेल यांच्या ट्विटरच्या आधारे हे वृत्त दिले आहे. या प्रकरणी त्यांनी आपल्याला या घटनेचे वार्तांकन कारण्यापासून रोखल्याचा आरोप देखील त्यांनी पाकिस्तानी लष्करावर केला आहे. जैश-ए-मोहम्मद चा म्होरक्या मसूद अजहर देखील या रुग्णालयात उपचार घेत असल्याचा दावा देखील त्यांनी यावेळी केला आहे.

या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले होते कि, ‘रावळपिंडीच्या लष्करी रुग्णालयात झालेल्या भीषण बॉम्बस्फोटानंतर १० जणांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आले आहे. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहर देखील येथेच उपचार घेत आहे. या घटनेचे वार्तांकन करु नये अशी सक्त ताकीद लष्कराकडून माध्यमांना देण्यात आली आहे’. त्यामुळे पुन्हा एकदा पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड पडला आहे.

दरम्यान, जैश-ए-मोहम्मद चा म्होरक्या मसूद अजहर हा भारतातील अनेक दहशतवादी हल्ल्यांचा सूत्रधार असून पाकिस्तान त्याला साथ देत आहे. त्याचबरोबर या हल्ल्याची कोणतीही अधिकृत माहिती पाकिस्‍तान सरकारकडूनही देण्‍यात आलेली नाही. मात्र या पत्रकाराच्या ट्विटनंतर अजहर या हल्ल्यातून बचावला असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

आरोग्य विषयक वृत्त –

माणसाच्या पोटात ‘मायक्रोप्लास्टिक’चे कण जाण्याचे प्रमाण चिंताजनक

गॅस, अ‍ॅसिडिटी टाळण्यासाठी करा ‘ही’ एक्सरसाइज ; मिळेल आराम

कमी झोप घेऊन जास्त काम करणे शरीरासाठी घातक

डोळे लाल होण्याची ‘ही’ आहेत कारणे, दुर्लक्ष करू नका