COVID-19 : ‘कोरोना’विरुद्धच्या लढाईत अभिनेत्रीचा मदतीचा हात ! करणार स्वत:च्या ‘न्यूड’ फोटोचा लिलाव (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  भारतासह जगभर हाहाकार माजवणाऱ्या कोरोना व्हायरसचा इटली आणि अमेरिका अशा देशात जास्त प्रकोप पहायला मिळत आहे. अशात अनेक बॉलिवूड आणि हॉलिवूड स्टार्स आपापल्या देशासाठी मदतीचा हात देत पुढे येत आहे. हॉलिवूड स्टार जेनिफर अॅनिस्टन (Jennifer Aniston) हिनं याच दिशेनं एक पाऊल टाकलं आहे.

कोरोन विरोधात सुरू असलेल्या युद्धात फंड गोळा करण्यासाठी जेनिफर तिच्या न्यूड फोटोचा लिलाव करणार आहे. जेनिफरचा हा फोटो 1995 मधील आहे. जेनिफर यातून मिळणारी रक्कम ही कोरोना व्हायरस रिलीफ फंडात जमा करणार आहे.

https://www.instagram.com/p/CA0Rm5eD4m8/?utm_source=ig_embed

जेनिफरनं इंस्टावरून एक पोस्ट शेअर केली आहे. यात ती म्हणते, “माझा खास मित्र मार्कनं 25 फोटोंचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. यात माझाही एक फोटो आहे. कोरोना रिलीफ फंडात देण्यासाठी रक्कम जमा करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या या फोटोची किंमत 6500 डॉलर आहे.” सोबत तिनं एक व्हिडीओ आणि फोटोही शेअर केला आहे ज्याचा लिलाव केला जाणार आहे.

जेनिफरनं काही महिन्यांपूर्वीच इंसटावर डेब्यू केला होता. तिनं काही तासातच (5 तास 16 मिनिटे) 1 मिलियन फॉलोवर्सचं रेकॉर्ड तयार केलं होतं. यानंतर तिचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आलं होतं.