51 वर्षाच्या जेनिफर लोपेजने शेअर केलाय न्यूड डान्स व्हिडीओ

पोलिसनामा ऑनलाईन टीम, दि. 17 जानेवारी : 51 वर्षाची अमेरिकन सिंगर आणि अ‍ॅक्ट्रेस जेनिफर लोपेज हिच्या एका व्हिडीओने सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घातलाय. जेनिफरने नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला असून तिच्या चाहत्यांमध्ये खळबळ माजलीय. हा व्हिडीओ तूर्तास वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडीओत जेनिफरने न्यूड पोज दिल्यात.

हा व्हिडिओ जेनिफरच्या ’इन द मॉर्निंग’ या नवीन गाण्याचा असून जो तिने तिच्या इन्स्टाग्रामवर अकाऊंटवर शेअर केलाय. जेनिफर या व्हिडिओमध्ये कपड्यांशिवाय दिसतेय. तसेच तिच्या शरीरावर परीसारखे पंख लावलेत.

 

 

 

 

 

मी तुझ्यावर माझ्यापेक्षा अधिक प्रेम केलंय. हा व्हिडिओ म्हणजे एकतर्फी प्रेमावर भाष्य करणारा असून सांकेतिकांनी परिपूर्ण आहे. तुम्ही कोणालाही बदलू शकत नाही. तुम्ही स्वत: ला बदलू शकता. त्यामुळे तुमच्या पंखांना जन्म द्या. जिथे तुमची काहीच किंमत नाही, तेथून दूर जा,’ असे हा व्हिडीओ शेअर करताना जेनिफरने लिहिलंय.

जेनिफर लोपेजचा हा व्हिडिओ पाहून चाहते थक्क झालेत. 50 शी ओलांडलेल्या जेनिफरने ज्याप्रकारे स्वत:ला फिट ठेवलंय. ते पाहून अनेक चाहते तिचे कौतुक करत आहेत. तिच्या व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंट्स अधिक येत आहेत.

 

 

 

 

जेनिफर ही अमेरिकन गायिका, अभिनेत्री, निर्माती आहे. कॉमेडी शोमधून डान्सर म्हणून तिने आपल्या करिअरची सुरुवात केलीय. यानंतर तिने अभिनयाच्या दुनियेत पाऊल ठेवले आहे. 1999 मध्ये तिने आपला पहिला स्टुडिओ अल्बम रिलीज केलाय. यापूर्वी जेनिफर ’हसलर्स’ चित्रपटात शेवटची दिसली होती. हा चित्रपट एका क्राइम ड्रामावर आधारित होता. या चित्रपटामध्ये जेनिफरशिवाय लिली रीनहर्ट, ज्युलिया स्टिल्स, केके पामर, कार्डी बी आदी कलाकार भूमिकेत दिसले होते.