युथ ऑलिम्पिक : जेरेमीनला वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक, ताबाबी देवीला ज्युडोत रौप्यपदक

ब्युनोस आयरिस :

अर्जेंटिना येथे सुरु असलेल्या युथ ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या भारताच्या जेरेमी लालरिननुगा याने वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक जिंकून दिले आहे. युथ ऑलिम्पिकमध्ये देशाला सुवर्णपदक मिळवून देणारा जेरेमी पहिला क्रीडापटू ठरला आहे. जेरेमी लालरिननुंगाने ६४ किलो वजनी गटात एकूण २७४ किलो वजन उचलून सुवर्णपदक नावावर केले. जेरेमी लालरिननुंगाने युवा जागतिक आणि युवा राष्ट्रकुल स्पर्धेत अनुक्रमे रौप्यपदक व सुवर्णपदक जिंकले आहे.

जेरेमीने क्लीन अॅन्ड जर्क प्रकारातील अखेरच्या प्रयत्नात १५० किलो वजन उचलले. तर स्नॅचमध्ये त्याने १२४ किलो वजन उचलले. सोमवारी रात्री झालेल्या या १५० मुकाबल्यात त्याने तुर्कस्थानच्या टॉपटस कानेर आणि कोलंबियाच्या व्हिलर एस्टिव्हन यांना मागे टाकत सुवर्ण पदकावर नाव कोरले.

जेरेमी येत्या २६ ऑक्टोबर रोजी १६ वर्षाचा होणार आहे. भारतीय वेटलिफ्टिंगचा भविष्याचा चेहरा म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते. याआधी त्याने युथ आशियाई चॅम्पियन स्पर्धेत रौप्य पदक जिंकले होते. दरम्यानच्या काळात त्याने दोन राष्ट्रीय विक्रम देखील स्वत:च्या नावावर केले होते.

[amazon_link asins=’B073FKXQ9H,B01M3QQOAX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1c5af726-cb91-11e8-b65e-818f531954c6′]

ताबाबी देवीला ज्युडोत रौप्यपदक

अर्जेंटिना येथे सुरु असलेल्या युथ ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या खात्यात आणखी एका पदकाची भर पडली आहे. जेरेमीनला वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक मिळवून भारताचे खाते उघडले आहे . यानंतर ज्युडो प्रकारात भारताच्या ताबाबी देवीलाही रौप्यपदक मिळालं आहे. याचसोबत ताबाबी भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये ज्युडो प्रकारात पदक मिळवणारी पहिली खेळाडू ठरली आहे.

युथ ऑलिम्पिक स्पर्धेत १३ क्रीडा प्रकारांमध्ये भारताचे ४६ खेळाडू सहभागी झाले आहेत, त्यामुळे भारताच्या खात्यात या स्पर्धेत किती पदक येतायत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

[amazon_link asins=’B077S3Y5MQ,B01I59VBLO’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’36332d7e-cb91-11e8-bda3-7b7c93be0c4c’]