अहो, आश्चर्य ! इतिहासात प्रथमच एका इनिंगमध्ये 12 जणांनी केली ‘बॅटींग’

जमैका : वृत्तसंस्था – आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रथमच एक आश्चर्य वेस्ट इंडिज भारत दरम्यानच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात घडले आहे. या सामन्यात वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात चक्क १२ फलंदाजांनी बॅटींग केली तरीही ते वेस्ट इंडिजचा पराभव रोखू शकले नाहीत. संघात ११ खेळाडु असताना १२ जण खेळले.

भारत आणि वेस्ट इंडिजच्या दरम्यान जमैका येथील सबीना पार्क मैदानावर दुसरा कसोटी सामना खेळविण्यात आला. क्रिकेटच्या कोणत्याही सामन्यात ११ खेळाडु असतात आणि त्यातील १० जण बाद होतात व एक फलंदाज नाबाद राहतो. आता तुम्ही म्हणाल की मग १२ जणांनी कशी काय फलंदाजी केली. तर त्यामागचे कारण स्पष्ट करुया.

वेस्टइंडिजच्या संघातील डेरेन ब्रावोला तिसऱ्या दिवशी इशांत शर्माच्या गोलंदाजीवर हेल्मेटला चेंडू लागला होता. तरीही तो फलंदाजी करत होता. चौथ्या दिवशी डेरेन ब्रावो फलंदाजीला उतरले. काही चेंडु खेळल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागले. मेडिकल टीमने त्याला तपासल्यानंतर त्याला रिटायर्ड हर्ट करुन मैदानाबाहेर घेऊन गेले होते. तोपर्यंत ब्रावोने २३ धावा केल्या होत्या. त्यानंतर काही वेळातच रिटायर्ड हर्ट झालेल्या डेरेन ब्रावोच्या जागी सामन्यातील बारावा खेळाडुुच्या रुपात जेर्मेन ब्लैकवुड फलंदाजी करणार असल्याचे जाहीर करण्यात आले. ही घोषणा झाल्या पाठोपाठ वेस्ट इंडिजचा चौथा बळी गेला. आणि पॅड बांधून तयार असलेला जेर्मेन ब्लैकवुड हा मैदानात उतरला. त्याने ३८ धावांची खेळी केली. त्यानंतर बाकी फलंदाजांनी बॅटींग केली. यामुळे वेस्ट इंडिजकडून १२ खेळाडुंनी फलंदाजी केली.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like