HomeशहरमुंबईJersey | शाहीद कपूरने शेअर केला जर्सी चित्रपटाचा नवीन पोस्टर, लिहिलं असं...

Jersey | शाहीद कपूरने शेअर केला जर्सी चित्रपटाचा नवीन पोस्टर, लिहिलं असं काही की…

मुंबई – पोलीसनामा ऑनलाइन –  Jersey | बॉलिवूड अभिनेता शाहीद कपूरने (Shahid Kapoor) त्याच्या आगामी ‘जर्सी’ (Jersey) चित्रपटाचे नवीन पोस्टर शेअर केलं आहे. त्याने बुधवारी त्याच्या इंस्टाग्राम अकाउंट वर जर्शी चित्रपटाचे नवीन पोस्टर (Poster) चाहत्यांसाठी शेअर केले. त्या चित्रपटाची नवीन पोस्ट शेअर करताना शाहीद कपूरने त्याच्या कॅप्शनमध्ये जे लिहिलं आहे त्याचं खूप कौतुक होत आहे.

शाहिद कपूर आणि मृणाल ठाकूर (Mrunal Thakur) यांचा ‘जर्सी’ (Jersey) हा चित्रपट याच डिसेंबर महिन्यात प्रकर्शित होत आहे. हा चित्रपट 31 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होताच तो नेटफलिक्स (Netflix) वर देखील पाहता येईल. शाहिद कपूरने रिलीज होणाऱ्या चित्रपटाचे नवीन पोस्टरमध्ये ही माहिती देण्यात आली आहे. शाहिद कपूरचा चित्रपट जर्सी हा तेलगू चित्रपटाचा रिमेक आहे. चित्रपटाचे तेलुगू भाषेतील शीर्षक देखील जर्सी आहे.

जर्सी या चित्रपटात एका क्रिकेटपटूची कथा सांगितली जाईल. यामध्ये संबंधित क्रिकेटपटू वयाच्या तिसाव्या वर्षी क्रिकेट खेळण्यास सुरुवात करतो. या चित्रपटाचे दिग्दर्शन गौतम तिन्नानुरी (Gautam Tinnanuri) यांनी केलं आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात अभिनेत्यासोबत त्याचे वडिल दिग्दर्शक पंकज कपूर (Pankaj Kapoor) ही दिसणार आहेत.

‘जर्सी’ या चित्रपटापूर्वी शाहिद कपूरचा शेवटचा चित्रपट ‘कबीर सिंग’ (Kabir Singh) होता. हा चित्रपट 2019 मध्ये प्रदर्शित झाला होता आणि त्याच शाहिद कपूरच्या अभिनयाचे प्रेक्षकांनी खूप कौतुक केलं होतं. हा चित्रपट देखील ‘अर्जुन रेड्डी’ (Arjun Reddy) नावाच्या दक्षिण भारतीय चित्रपटाचा रिमेक होता . शाहिदचा आगामी चित्रपट ही साऊथचा रिमेक आहे. शाहिदने शेअर केलेल्या या चित्रपटाच्या नवीन पोस्टरला आतापर्यंत दीड लाखाहून अधिक लोकांनी लाईक केले आहे आणि चाहत्यांनी भरभरुन प्रेमाचा वर्षाव केला आहे.

Web Title : Jersey | actor shahid kapoor shared the new poster of the film jersey on instagram

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sitaram Kunte | निवृत्तीनंतर सीताराम कुंटे यांची ‘या’ महत्त्वाच्या पदी नियुक्ती

Maharashtra Rains | पुणे, मुंबई, नाशिकसह कोकणात पाऊस सुरु

IMD | पालघर, ठाणे आणि मुंबईत आज होऊ शकतो मुसळधार पाऊस; जाणून घ्या इतर ठिकाणचा अंदाज

LPG Price | एलपीजी सिलेंडर स्वस्त होण्याच्या सर्वसामान्यांच्या अपेक्षेला जोरदार झटका ! 100 रुपयांनी महागला कमर्शियल सिलेंडर; जाणून घ्या

Health Test In 30 Sec | ‘या’ 3 सोप्या चाचण्या 30 सेकंदमध्ये सांगतील किती हेल्दी आहात तुम्ही? घरीच करा आरोग्य तपासणी; जाणून घ्या

Sameer Wankhede | समीर वानखेडेंची राज्य सरकारच्या ‘या’ समितीकडून चौकशी

Omicron Variant | भारतात आज मध्यरात्रीपासून प्रवाशांसाठी नवे नियम लागू, जाणून घ्या नवीन नियमावली

Omicron Variant | भारतात केवळ 20% लोकसंख्येला ओमिक्रॉनचा धोका, व्हेरिएंटचे ‘सॉफ्ट टार्गेट’ कोण? जाणून घ्या

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News