Coronavirus : ‘कोरोना’चा कहर ! ज्या चर्चमध्ये येशू यांना लटकवलं तो 700 वर्षानंतर बंद

पोलीसनामा ऑनलाईन : संपूर्ण जगाला सध्या कोरोना विषाणूसारख्या साथीच्या रोगाचा सामना करावा लागला आहे. या विषाणूच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले आहे. मंदिर-मशिदीपासून चर्च आणि गुरुद्वारापर्यंत सर्व काही बंद झाले आहे. इतकेच नव्हे तर व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी 700 वर्षांनंतर जेरुसलेममधील त्या पवित्र चर्चलाही बंद ठेवण्यात आलं आहे, जिथे येशू ख्रिस्तांना फासावर लटकविण्यात आले होते.

जेरुसलेममधील या चर्चमध्ये येशूला फासावर लटकविण्यात आले होते. त्यानंतर त्यांना तेथेच पुरण्यात आले. ख्रिश्चनांसाठी हे जगातील सर्वात पवित्र स्थान मानले जाते. यापूर्वी हे चर्च प्लेग रोगामुळे 1349 मध्ये बंद ठेवण्यात आले होते. ब्लॅक प्लेग संपूर्ण आशियामध्ये पसरल्यानंतरहे चर्चा पहिल्यांदा बंद करण्यात आले होते. ब्लॅक प्लेगमुळे लाखो लोक युरोपमध्ये मरण पावले. दरम्यान, ब्लॅक प्लेगमुळे, 12 जहाज बर्‍याच महिन्यांपासून समुद्रात थांबले होते. जेव्हा साथीचा प्रादुर्भाव संपला तेव्हा त्या जहाजाचे चालक आणि बहुतेक प्रवासीही मरण पावले. ते चित्र पाहून लोक घाबरून गेले.

या चर्चची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे याची चावी एका मुस्लिम कुटूंबाकडे असते. हे गेल्या 8 पिढ्यांपासून चालू आहे. चर्च बंद झाल्या कारणाने चावी असणाऱ्या कुटुंबाने म्हंटले कि, चर्च बंद असल्याचे पाहणे फार दुःखद आहे .