अभिनेत्रीचे बाथरूममध्ये आढळले होते मृतदेह, मृत्यूचे कारण अद्यापही गुलदस्त्यात

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  अमेरिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री जेसिका कॅम्पबेलचे 29 डिसेंबर रोजी मृत्यू झाला. तिचे पार्थिव तिच्या पोर्टलँडमधील घरात आढळून आले होते. तिचे निधन कशामुळे झाले हे अद्याप समजले नाही. जेसिका ही अभिनेत्री असण्यासोबतच एक फिजिशनदेखील होती. जेसिकाच्या निधनाला इतके दिवस उलटूनही पोस्टमॉर्टम रिपोर्ट अद्याप मिळाला नाही. तिचा मृत्यू कशाने झाला हे शोधण्याचा तिचे कुटुंबिय प्रयत्न करत आहेत.

https://www.instagram.com/todayshow/?utm_source=ig_embed

जेसिकाला गेल्या काहि दिवसांपासून श्वास घ्यायला त्रास होत होता. त्यामुळे तिचे निधन झाले असेल असे तिच्या कुटुंबियांना वाटत आहे. जेसिकच्या एका नातलगाने मीडियाशी बोलताना सांगितले होते की, जेसिका दररोजप्रमाणे तिच्या क्लिनिकला गेली होती. त्यानंतर घरी आल्यानंतर कुटुंबातील मंडळींसोबत तिने गप्पा मारल्या आणि ती बाथरूममध्ये गेली. ती खूप वेळ बाथरूममधून परत आली नाही. म्हणून तिची आई तिला पाहण्यासाठी गेली. त्यावेळी समोरचे चित्र पाहून तिला धक्का बसला. कारण जेसिकाचा बाथरुममध्ये मृतदेह आढळला होता. जेसिकाने इलेक्शन या चित्रपटात काम केले होते. या चित्रपटात रिस विदरस्पूनसोबत तिची जोडी जमली होती. तसेच तिने काही मालिकांमध्ये देखील काम केले आहे. पण अभिनयक्षेत्रात तिला यश मिळाले नाही. त्यामुळे तिने डॉक्टरकीचे शिक्षण घेतले होते.

https://www.instagram.com/jornaldecapitolio2/?utm_source=ig_embed