जेट एअरवेजचे कर्मचारीच बनणार आता ‘मालक’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कर्जाच्या बोजाखाली दबून बंद पडलेल्या जेट एयरवेजच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता या कंपनीचे कर्मचारीच विमान कंपनीचे मालक होणार आहेत. त्यामुळे खरंच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ ही घोषणाच यातून पूर्णत्वास येताना दिसत आहे. यासाठी जेट एअरवेजचे कर्मचारी आणि ब्रिटनची कंपनी आदि ग्रुपनं यासाठी बोली लावण्याची तयारी दर्शवली आहे. यामध्ये दोघे मिळून कंपनीच्या ७५टक्के समभागांसाठी बोली लावणार आहेत.

सध्या जेट एयरवेजवर एकूण २५ हजार कोटींचे कर्ज आहे. यामध्ये बँकांचं जवळपास ८५०० करोड रुपये तसंच वेंडर, पट्टा देणारे आणि कर्मचारी यांचे सर्वांचे मिळून २५ हजार कोटी रुपये कर्ज आहे. याविषयी कंपनीचे कर्मचारी आणि आदि ग्रुपनं एका प्रसिद्धिपत्रक काढून माहिती दिली आहे. आर्थिक संकटांशी सामना करणारी जेट एअरवेजच्या विमानांची उड्डाणं १७ एप्रिलपासून बंद आहेत. त्यामुळे अनेक कर्मचारी बेरोजगार झाले असून सध्या त्यांच्यापुढे जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी मिळून या बोलीसाठी अडीच ते तीन हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यामुळे आता कर्मचारीच या कंपनीचे मालक बनणार आहेत.

दरम्यान, या कंपनीच्या विरोधात ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’नं २६जून रोजी तर इतर कर्जदारांकडून २० जून रोजी दिवाळखोरीची याचिका दाखल करण्यात आली होती. त्यामुळे आता हे कर्मचारी आणि आदि ग्रुप हि बोली जिंकतो कि नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुंसह इतरांवर अ‍ॅट्रोसीटीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश

तबरेज अंसारी मॉब लिंचिंग विरोधात पुण्यात आक्रोश आंदोलन

अल्पसंख्याकावर हल्ला म्हणजे संविधानावर हल्ला – हाफिज अ.गफार

ज्वारीची भाकरी ‘या’ आजारांवर ठेवते नियंत्रण

सकाळी उठल्यानंतर पाणी पिल्याने होतात ‘हे’ फायदे

आमिर खानसोबत चित्रपटात काम केलेल्या ‘या’ अभिनेत्रीने शेअर केला लहानपणीचा फोटो