जेट एअरवेजच्या प्रवाशांकडून ३० लाखांच्या भरपाईची मागणी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

मुंबईहून जयपूरला जाणाऱ्या जेट एअरवेजच्या उड्डाणादरम्यान कर्मचाऱ्याकडून ‘केबिन प्रेशर’ नियंत्रित न केल्याने प्रवाशांच्या नाक-कानातून रक्त वाहून अनेक प्रवासी आजारी पडले होते. यातील एका प्रवाशाने जेट एअरवेजकडे ३० लाख रुपयांची मागणी केली आहे. यासोबतच १०० अपग्रेड वाऊचरदेखील मागितले आहेत. एअरलाईन्सवर लक्ष न ठेवल्याचा आरोप चालक दलावर केलायं. मागणी पूर्ण न झाल्यास घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्याचा इशाराही त्याने दिलाय. मिळालेल्या माहितीनुसार, एअरलाइन्सकडून प्रवाशांच्या सोयी-सुविधा पाहण्यात, प्रवाशांच्या काळजी घेण्यामध्ये कमतरता जाणवली, असा आरोपही या प्रवाशानं केला आहे. शिवाय, उड्डाणादरम्यान घडलेल्या घटनेचा व्हिडीओदेखील शेअर करण्याची धमकी दिली आहे. प्रवासादरम्यान कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाल्यास एअरलाईन्स त्यांना भरपाई देते.

एसके आणि एसके पुन्हा एकत्र : राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

नेमके काय घडले

मुंबईहून पहाटे ५ वाजून ५२ मिनिटांनी जेट एअरवेजच्या विमानानं जयपूरला जाण्यासाठी उड्डाण घेतलं होतं. विमानातील कर्मचारी हवेचा दाब नियंत्रित करणारा स्वीच सुरू करण्यास विसरला, परिणामी शेकडो प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता. स्वीच सुरू न झाल्याने विमानातील हवेचा दाब वाढला. विमानात १६६ प्रवासी होते. त्यातल्या ३० ते ३५ जणांच्या कानातून रक्त येत होते, तर काही प्रवाशांना डोकेदुखीचा त्रास सुरू झाला. त्यामुळे खळबळ उडाली. त्यानंतर विमान पुन्हा मुंबई विमानतळावरील धावपट्टीवर उतरवण्यात आलं आहे.

दरम्यान, गुरुवारी घडलेल्या प्रकाराबाबत हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आणि महिनाभरात अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत. जेट प्रशासनाने या घटनेची चौकशी होईपर्यंत या विमानाचे मुख्य वैमानिक कॅप्टन आशिष शर्मा, फर्स्ट आॅफिसर अहमर खान यांच्याकडील विमान उड्डाणाची जबाबदारी काढून घेतली असून त्यांना तळावरील काम दिले आहे. डीजीसीए या प्रकरणाची चौकशी करत असून त्यात वैमानिक दोषी आढळल्यास त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात येईल, असे कंपनीने जाहीर केले.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’710a6c50-bd72-11e8-91b0-c9ba48449176′]