जेट एअरवेजचे आज रात्रीपासून उड्डाणं थांबणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जेट एअरवेजची उड्डाणं आज रात्रीपासून बंद होणार आहेत. बँकांनी ४०० कोटींची आपत्कालीन मदत देण्यास नकार दिल्याने जेट एअरवेजची सेवा बंद केली जाणार आहे. आज रात्री साडेदहा वाजता जेट एअरवेजचे विमान मुंबईहून अमृतसरसाठी उड्डाण करणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर विमान सेवा बंद करण्यात येणार आहे.

कर्जात बुडालेल्या जेट एअरवेजने बँकाकंडे ४०० कोटींची मदत मागितली होती. मात्र, बँकांनी मदत करण्यास नकार दिला. त्यामुळे आज रात्री बारा पासून जेट एअरवेजची विमानं उड्डाण करणार नाहीत. जेट एअरवेज संकटात सापडल्यामुळे २० हजार कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर टांगती तलवार आहे.

मागील आर्थिक वर्षात जेट एअरवेजला ४ हजार २४४ कोटींचे नुकसान सहन करावे लागले होते. कंपनीने जानेवारीपासून वैमानिकांना, अभियंत्यांना, व्यवस्थापन विभागातील कर्मचाऱ्यांना वेतन दिलेले नाही. इतर कर्मचाऱ्यांना अंशत: वेतन दिले जात होते. मात्र त्यांनाही मार्च महिन्याचा पगार देण्यात आलेला नाही. देशातील अव्वल विमान कंपनी असलेल्या जेट एअरवेजची पाच पेक्षा कमी विमानं सध्या उड्डाण करत आहेत. त्यांचीही सेवा आजपासून बंद हेणार आहे. कंपनीने सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाण देखील रद्द केली आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like