व्यापारी उदानी यांच्या हत्ये प्रकरणी मंत्री मेहतांच्या माजी सचिवला अटक 

मुंबई  : पोलीसनामा ऑनलाईन – व्यापारी राजेश्वर उदानी यांच्या हत्या प्रकरणी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या माजी खाजगी सचिवाला अटक करण्यात आली आहे. सचिन पवार असे या माजी सचिवांचे नाव असून घाटकोपर येथील सोन्याचे व्यापारी राजेश्वर उदानी यांचा मृतदेह पनवेल येथील जंगलात आढळल्या नंतर मुंबईमध्ये एकच खळबळ उडाली होती. आता मेहता यांच्या माजी सचिवाला अटक केल्या नंतर राजकीय वर्तुळात हि आश्चर्य व्यक्त केले जाते आहे.

५७ वर्षीय राजेश्वर उदानी हे २८ नोव्हेंबर पासून गायब होते. त्यांच्या घरच्या व्यक्तींनी त्यांच्या गायब असण्याची तक्रार पंतनगर पोलीस ठाण्यात दिली होती. ४ डिंसेबर रोजी पनवेल पोलिसांना नेरे जंगलात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला. सापडलेला मृतदेह  उदानी यांच्या घरच्यांनी त्यांच्या अंगावर असलेल्या सदऱ्या वरून आणि बेल्ट वरून ओळखला.

दरम्यान या पूर्वी पोलिसांनी राजेश्वर उदानी खून प्रकरणी काही बारबालांची हि चौकशी केली आहे.  सचिन पवार याची हि चौकशी करण्यात आली त्यानंतर त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. या प्रकरणात एका टीव्ही अभिनेत्रीची हि पोलिसांनी चौकशी केली असून तिचे नाव उघड केले नाही. हि अभिनेत्री हि या प्रकरणी पोलिसांच्या संशयाच्या घेऱ्यात आहे.
सचिन पवार नेमका आहे कोण ?
-२००९ मध्ये सचिन पवार हा भाजपचा बूथ प्रमुख म्हणून काम पहात होता.
-२०१२ साली त्याने महानगरपालिकेची निवडणूक अपक्ष लढवली त्यानंतर त्याची भाजप मधून हकालपट्टी करण्यात आली.
-२०१७ साली त्याने भाजप मधून पत्नीला तिकीट मिळवून दिले.
-सध्या सचिन पवार भाजपचा प्राथमिक सदस्य असून त्याच्याकडे कोणताही पदभार पक्षाने सोपवला नाही.

सचिन पवारशी माझा संबंध नाही – प्रकाश मेहता
सचिन पवारशी आपला २००२ मध्ये संपर्क झाला होता. २००९ ते २०१० मध्ये तो आपला खाजगी सचिव होता. त्यानंतर त्याच्याशी आपला कसलाही संबंध नव्हता असे मंत्री प्रकाश मेहता म्हणाले आहेत. सचिन पवार आपल्या पासून २०१० साली निघून गेल्या नंतर त्याची  टीव्ही क्षेत्रात जाण्याची हालचाल सुरु होती अशी माहिती मेहता यांनी दिली आहे.