90 वर्षाच्या महिलेची दागिने पॉलिश करण्याच्या नावाने ‘फसवणूक’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कंपनीकडून आलो असल्याचे सांगून दोघा भामट्यांनी एका ९० वर्षाच्या महिलेची दागिन्यांना पॉलिश करण्याच्या बहाण्याने सव्वा दोन लाखांची फसवणूक केली आहे. ही घटना येरवड्यातील फुलेनगरमध्ये २३ ऑक्टोबरला सकाळी ११ वाजता घडली.

याप्रकरणी ताराबाई दत्तात्रय गायकवाड (वय ९०) यांनी येरवडा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, ताराबाई गायकवाड या घरात असताना ३५ ते ४० वर्षाचे दोघे जण त्यांच्याकडे आले. आम्ही कंपनीकडून आलो असल्याचे सांगून त्यांना दागिन्यांना पॉलिश करुन देण्याचा बहाणा करुन देतो, असे आमिष दाखविले. त्यांच्याकडून सोन्याच्या बांगडया व मंगळसुत्र घेतले. कुकरमध्ये पाणी टाकून त्यात हे दागिने ठेवल्याचे भासवून त्यांनी हातचलाखी करुन काढून घेतले. कुकर गॅसवर ठेवायला सांगितले. पाणी थंड झाल्यावर दागिने काढून घ्या असे सांगून ते निघून गेले. गायकवाड यांनी नंतर पाहिले तर कुकरमध्ये दागिने नव्हते.

Visit : Policenama.com