घरगड्यांनी मारला 31 लाखांच्या दागिन्यावर डल्ला

पुणे/पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – घरकाम करणाऱ्या दोन नोकरांनी घरातील ३१ लाख रुपये किंमतीच्या हिरे आणि सोन्याचे दागिने चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास उघडकीस आला असून दोघांविरुद्ध पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोनम संतोष कटारे (वय-२९ रा. लिला हौसिंग सोसायटी, नेहरुनगर), प्राजक्ता उर्फ प्रज्ञा संजय लोंढे (वय-३० रा. मराठी शाळेजवळ, यशवंतनगर, पिंपरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या नोकरांची नावे आहेत. याप्रकरणी राजीव अशोक रोषा (वय-४५ रा. टेल्को वसाहत, अजमेरा, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पिंपरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हा दाखल करण्यात आलेले दोघेजण फिर्य़ादी रोषा यांच्या घरामध्ये घरकाम करतात. बुधवारी त्या दोघांपैकी एकाने घरातील बेडरुम मध्ये असलेल्या कपाटातून सोन्याचे आणि हिऱ्याचे ३० लाख ७५ हजार रुपये किंमतीचे दागिने चोरून नेले. फिर्य़ादी दुपारी दीडच्या सुमारास घरी आले असता हा प्रकार उघडकीस आला. पोलीस उप निरीक्षक निमगिरे पुढील तपास करीत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त

You might also like