बस स्थानकातील महिलेच्या पर्समधून लाखोंचे दागिने लंपास

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन – बस स्थानकातून चोरट्यांने लाखो रुपयांचे दागिने महिलेच्या पर्समधून गर्दीचा फायदा घेत लंपास केल्याची घटना उघड झाली आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी दिडच्या सुमारास धुळे बसस्थानकात घडली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, धुळे – खापर ही बस स्थानकातून खापर गावाकडे निघणार त्यावेळी एक महिला बसमध्ये परिवारासह प्रवास करीत होती. गाडीत चढतेवेळी महिलेच्या पर्सची चेन उघडून त्यातील सोन्याचे दागिने असलेली डबीच चोरट्याने गर्दीचा फायदा घेत लंपास केली. ही घटना शुक्रवारी दुपारी दीड वाजता बस स्थानकातील आवारात घडली. महिलेने बसमधली आसनावर बसताना तिला पर्सची चेन उघडी दिसली. त्यानंतर तीच्या लक्षात आले की, आपले दागिने चोरीस गेले आहेत. त्यामुळे महिलेने आरडाओरड केली. त्या डबीत सोन्याची साखळी, कानातले झुमके असे अंदाजे किंमत साडेतीन ते चार लाख रुपयांचे दागिने होते. महिलेने चोरीबाबतची तक्रार पोलीसात दिली आहे.

पोलीसांनी माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. प्रवाशांसह बस पोलीस ठाण्यात आणून चौकशी करण्याचे काम पोलीस करत आहे. बस स्थानकातील सिसिटिव्ही फुटेज तपासणीचे काम सुरू आहे.

Loading...
You might also like