देसी गर्ल बनण्यास जान्हवी कपूर ‘रेडी’, प्रियंका चोप्राकडून ‘ग्रीन सिग्‍नल’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अॅक्ट्रेस जान्हवी कपूर त्या प्रसिद्ध न्यूकमर स्टार्सपैकी आहे जे फॅशन आणि स्टाईल सेंससाठी चर्चेत असतात. जान्हवीचा फॅशन सेंस कमालीचा आहे. तिला चांगलं माहीत आहे की कोणत्या वेळी काय घालायचं. ती जीममधून बाहेर आली की, तिच्या लुक्सचे फोटो व्हायरल होत असतात. नुकतीच ती साडीच्या लुकमध्ये दिसली होती. तिचा हा फोटो व्हायरल होत आहेत.

जान्हवीने तिच्या इंस्टाग्रामवरून हा फोटो शेअर केला आहे. हा फोटो सिंपल असला तरी खूप सुंदर आणि हटके आहे. फ्लोरल प्रिंटवाली पीच कलरची साडी नेसून जान्हवीने केस मोकळे सोडले आहेत. कानात झुमके घालून तिने सौंदर्यात अजून भर घातली आहे. फोटोच्या कॅप्शनमध्ये जान्हवी म्हणते की, “पीचेस अँड क्रिम” जान्हवीचा हा फोटोही चाहत्यांना चांगलाच भावला आहे. काही तासांतच हा फोटो ५ लाखांहून अधिक लोकांनी लाईक केला आहे. बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोपडानेही हा फोटो लाईक केला आहे.

View this post on Instagram

Peaches and cream 🍦

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor) on

जान्हवी कपूर प्रियंका चोपडाच्या दोस्तानाच्या सिक्वलमध्ये दिसणार आहे. दोस्ताना मधील प्रियंका चोपडाचं देसी गर्ल हे गाणं खूपच गाजलं आहे. या गाण्यात तिने साडी नेसून डान्स केला होता. दोस्ताना २ मध्ये प्रियंका चोपडाऐवजी जान्हवी कपूर दिसणार आहे. सोबत लिड रोलमध्ये कार्तिक आर्यन असणार आहे. प्रियंकाला जान्हवीचा साडीवाला लुक इतका आवडला की, तिने कमेंटमध्ये हार्टची इमोजी पोस्ट केली आहे.
PC
वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, धडक नंतर जान्हवीकडे बॅक टू बॅक अनेक सिनेमे आहेत. लवकरच ती आता दोस्ताना २ मध्ये दिसणार आहे. याशिवाय गुंजन सक्सेनाच्या बायोपिकमध्येही ती झळकणार आहे. याव्यतिरीक्त जान्हवी करण जोहरच्या तख्त आणि रुही आफ्जा मध्येही काम करणार आहे.

रोज सकाळी ‘मनुक्यांचे पाणी’ प्या आणि मिळवा ‘हे’ आश्चर्यकारक फायदे

उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी ७ उपाय

‘तळहात’ पाहून सुद्धा ओळखू शकता, तुम्हाला आहे कोणता आजार ?

रक्ताचा अभाव, कॅन्सरसारख्या गंभीर आजारांवर ‘पांढरा कांदा’ उपयोगी

सावधान ! ‘गहू’ आरोग्यासाठी नुकसानकारक

 

Loading...
You might also like