अभिनेत्री जान्हवी कपूरला मनालीमध्ये दिसला महिलेचा ‘आत्मा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – ८० च्या दशकातील सुपरस्टार श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर चित्रपटाच्या शुटिंगसाठी मनालीला गेली आहे. ती मनालीमध्ये साइस्ट्रस हॉटेलमध्ये थांबली आहे. मनालीच्या एका विहारामध्ये चित्रपटाचे काही सीन सुट केले गेले आहे. शुटिंग दरम्यान जान्हवी कपूरला पांढऱ्या कपड्यांमध्ये एक महिलेचा आत्मा गाणे गुनगुनताना दिसून आला. हा ‘रुह आफजा’ चित्रपटाचा सीन होता. या सीनला १० वेळा रिटेक केल्यानंतर हा व्यवस्थित सीन झाला.

चित्रपटातील मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता राजकुमार राव मनाली पोहचताच त्यांच्यावर चित्रपटातील काही सीन केले गेले. हॉरर रोमॅंटिक थीमवर बनलेल्या या चित्रपटामध्ये राजकुमार रावने भूताची भूमिका साकारली आहे. वरुण शर्मा ही त्यांच्यासोबत काम करत आहे. जान्हवीला तर महिलेचा आत्मा दिसला आणि भूताची भूमिका तर राजकुमार करत आहे आणि त्यांना ती आत्मा दिसत नाही.

शुटिंगच्या दरम्यान पावसाने खलनायकाची भूमिका बजावली आहे. पावसामुळे तीनवेळा शूटिंग थांबवावी लागली. संध्याकाळपर्यंत फक्त तीन सीन ओके झाले. चित्रपटाचे स्थानिक समन्वयक अनिल कायस्था म्हणाले की, हे युनिट पुढच्या आठवड्यापर्यंत मनालीमध्ये राहणार आहे.

मनालीमध्ये बॉलिवूड सिताऱ्यांचे आगमन झाल्यामुळे तेथील व्यवसायाला गती मिळण्याची अपेक्षा आहे. पर्यटन सीजन आता समाप्त होण्याच्या मार्गावर होता पण सेलेब्रिटींमुळे आता हे पुढे चालण्याच्या मार्गावर आहे. मनालीमध्ये चित्रपटाची टिम महिनाभर तिथेच राहणार. याचा फायदा तेथील व्यवसायकांना नक्कीच होणार.

आरोग्य विषयक वृत्त

संधिवाताच्या रुग्णांना कोणते खाद्यपदार्थ ठरू शकतात फायदेशिर, जाणून घ्या

आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांवर घरच्याघरी होऊ शकतात उपाय

हेअर ड्रायरचा अतीवापर ‘केसां’साठी धोकादायक

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like