‘एवढ्या’ गर्दीनं जिंकणं कठीण’ ! 25-25 लोकांना फोन करा, अमित शहांनी रॅलीत सांगितलं (व्हिडिओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – झारखंडच्या चतरा येथे सभेला संबोधित करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी २५-२५ लोकांना बोलावून भाजपला मतदान करण्याचे आवाहन जमावाला केले आहे. सलग दुसऱ्यांदा निवडणुका जिंकण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.

अमित शहा म्हणाले, ‘या १०-१५ हजार लोकांसह आपण जिंकू का, मला ही गणित माहित आहे, मी एक बनिया आहे, मला फसवू नका, आपल्याला एक मार्ग सांगतो, तुम्ही कराल का, प्रत्येकाने आपल्या हातात मोबाइल घ्या आणि आपल्या संबंधातील २५-२५ लोकांना फोन करा आणि कमळ चिन्हावर मत देण्याचे आवाहन करा.’

अस्थिर सरकार बनवू नका : शाह
जाहीर सभेला संबोधित करताना अमित शहा म्हणाले की झारखंड निवडणुकीत एका बाजूला भाजपा आहे जी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाच्या सुरक्षा आणि विकासासाठी काम करते. तर दूसऱ्या बाजूने काॅंग्रेस आणि जेएमएम यांची युती आहे, ज्यांनी झारखंडला भ्रष्टाचाराशिवाय काहीच दिले नाही.

ते पुढे म्हणाले की अटलबिहारी वाजपेयी यांनी झारखंड बनवले आणि नरेंद्र मोदी आणि रघुबर दास यांनी ते बांधण्याचे काम केले आणि ते पुढे नेले. जनतेला मत देण्याचे आवाहन करताना शहा म्हणाले की तुम्ही जेव्हा मतदानाला जाल तेव्हा अस्थिर सरकार बनवायला मत देऊ नका. कधीकधी अपक्ष राज्याचे मुख्यमंत्री व्हायचे आणि दिल्लीत काँग्रेसला कोट्यावधी रुपये पाठवायचे. अस्थिर सरकारमुळे झारखंडचा विकास कधीच झाला नाही. असे सांगत त्यांनी आपल्या बाजूने मतं वळवण्याचा प्रयत्न केला.

नक्षलवादाला मुळापासून उपटून फेकू : शाह
काही दिवसांपूर्वी लातेहार येथे झालेल्या नक्षलवादी हल्ल्याबद्दल शहा म्हणाले की लातेहारमध्ये चार पोलिस कर्मचारी शहीद झाले, मी या मंचावरून नक्षलवाद्यांना सांगायला आलोय की काय उत्सव करायचा तो करून घ्या, येथे पुन्हा भाजपाचे सरकार स्थापन होणार आहे म्हणजेच नक्षलवादाला मुळापासून उपटून काढत आम्ही नक्षलवादाचे उच्चाटन करू.

शाह पुढे म्हणाले की, गेली ७० वर्षे काॅंग्रेस पक्ष अयोध्या प्रकरण चालवू देत नव्हता. हे प्रकरण २०१८ मध्ये पुढे आल्यावर काॅंग्रेस नेते कपिल सिब्बल म्हणाले की, २०१९ नंतर देखील हे प्रकरण चालले पाहिजे. पण श्रीरामांची इच्छा काही वेगळीच होती. २०१९ मध्ये मोदी आले आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर भव्य राम मंदिराचा मार्ग मोकळा झाला. आता भगवान श्रीराम यांच्या जन्मस्थळावर आभाळाला गवसणी घालणारे राम मंदिर बनणार. यापासून आम्हाला कोणीही रोखू शकत नाही असे शहांनी सांगितले.

Visit : Policenama.com