Jharana Das Passes Away | ज्येष्ठ अभिनेत्री झरना दास यांचं निधन

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Jharana Das Passes Away | मनोरंजन सृष्टीतून एकामागे एक निधनाच्या बातम्या समोर येत आहेत, तर आता आणखीन एका कलाकाराचे निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. दिग्गज अभिनेत्री झरना दास यांनी वयाच्या 77 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. या बातमीने पुन्हा एकदा मनोरंजन सृष्टीत शोककळा पसरली आहे. ओडिया चित्रपट सृष्टीत नामवंत अभिनेत्री म्हणून त्यांची ओळख आहे. (Jharana Das Passes Away)

 

गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. झरना यांचे त्यांच्या राहत्या घरीच निधन झाले. आजपर्यंत ओडिया चित्रपट सृष्टीत त्यांनी त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात त्यांची छाप निर्माण केली होती, तर त्यांच्या अभिनयाने राज्य सरकारने त्यांना प्रतिष्ठित जयदेव पुरस्कारही प्रदान केला होता. आता त्यांच्या जाण्याने ओडिया चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. (Jharana Das Passes Away)

 

झरना यांनी ऑल इंडिया रेडिओ, कटक येथे बालकलाकार म्हणूनदेखील काम केले होते. तर त्यांनी आजवर श्री जगन्नाथ, नारी, आदिनामेघा, हिसबनिकस, पूजाफुला, अमदबता, मालाजन्हा आणि हीरा नेला यांसारख्या अनेक ऐतिहासिक चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचल्या होत्या. एवढेच नाही तर ओडिशाचे माजी मुख्यमंत्री हरेकृष्ण महताब यांच्या चरित्रात्मक माहितीपटातील त्यांच्या दिग्दर्शनाचे अनेकांनी कौतुकदेखील केले होते. झरना यांचा 1985 मध्ये जन्म झाला. त्यांनी 60 च्या दशकात त्यांच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती.

 

Web Title :- Jharana Das Passes Away | actress jharna das passes away

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Thane Measles Update | मुंबईपाठोपाठ ठाणेसुद्धा ‘गोवर’च्या विळखेत; मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्यात आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू

Pravin Darekar | 123 कोटींच्या कथित घोटाळ्याप्रकरणी मुंबै बँकेचे अध्यक्ष भाजप आमदार प्रवीण दरेकरांना आरोपपत्रातून वगळले

Sanjay Raut | ‘शिवसेना सोडली आणि हेमंत गोडसे यांची कारकीर्द संपली, त्यांनी स्वत:च स्वत:ची कबर खोदली’ – संजय राऊत