‘हे’ फक्त भारतातच होऊ शकतं ! मतदारांना खुश करण्यासाठी नेत्याकडून चक्क ‘नागीण’ डान्स

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – निवडणुकांच्या वेळी मतदारांना खुश करण्यासाठी उमेदवारांकडून अनेक मार्गांचा अवलंब केला जातो. झारखंडमध्ये सध्या विधानसभेच्या निवडणूका होताहेत अशावेळी मतदारांना खुश करण्यासाठी एका नेत्याने चक्क नागीण डांस केल्याचे पहायला मिळत आहे. याबाबतचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतोय.
झारखंड: जब वोटरों को रिझाने के लिए नागिन डांस करने लगे JVM नेता

झारखंडमधील देवघर येथील विधानसभा मतदारसंघात झारखंड विकास मोर्चाचे (जेवीएम) उदय शंकर सिंह उर्फ चुन्ना सिंह यांनी प्रचारादरम्यान आपल्या समर्थकांसोबत नागीण डांस केल्याचे पहायला मिळाले.
झारखंड: जब वोटरों को रिझाने के लिए नागिन डांस करने लगे JVM नेता

विधानसभेच्या प्रचारासाठी फिरत असलेल्या चुन्ना सिंह यांना समर्थकांनी ‘तू सपेरा’ या गाण्यावर ताल धरण्यास सांगितले तेव्हा त्यांनी देखील नागीण डांस केल्याचे समजते. 1985 ते 2005 पर्यंत चुन्ना सिंह यांनी सारठ विधानसभा विभागाचे नेतृत्व केले होते. व्हायरल झालेल्या व्हिडिओबाबत त्यांना विचारले असता कला आणि संस्कृती या काही लपवण्याच्या गोष्टी नसल्याचे सांगत लोकांमध्ये असताना अशा गोष्टी आपोआप बाहेर येत असल्याचे देखील चुन्ना सिंह यांनी सांगितले.
झारखंड: जब वोटरों को रिझाने के लिए नागिन डांस करने लगे JVM नेता

2014 मध्ये चुन्ना सिंह यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती आणि त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता आणि यावेळी जेवीएमचे उमेदवार रणधीर सिंह विजयी झाले होते. यावेळी मात्र भाजपने रणधीर सिंह यांना मंत्रिपदाची ऑफर दिल्याने ते भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. आणि चुन्ना सिंह हे जेवीएमच्या तिकिटावर निवडणूक रिंगणात उतरलेले आहेत.
झारखंड: जब वोटरों को रिझाने के लिए नागिन डांस करने लगे JVM नेता

झारखंड: जब वोटरों को रिझाने के लिए नागिन डांस करने लगे JVM नेता
Visit :  Policenama.com