‘राहुल-प्रियंका’ आणि ‘मोदी-शहां’ची अशीही बरोबरी, झारखंडमधील चकित करणारी आकडेवारी

रांची : वृत्तसंस्था  झारखंड विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसला अच्छे दिन आल्याची चर्चा सुरू झाली आहे. येथे काँग्रेसने भाजपाला दिलेल्या धोबीपछाडीमुळे जनतेचा मुड बदलला असल्याचे बोलले जात आहे. त्यातच झारखंड जिंकण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे चाणक्य आणि गृहमंत्री अमित शहा यांनी सर्व ताकद पणाला लावली होती. परंतु, काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी-शहांची जादू चालू दिली नाही. झारखंडच्या निकालानंतर समोर आलेल्या आकडेवारीची तुलना करून मोदी-शहा आणि प्रियंका-राहुल अशी बरोबरी केली जात आहे.

झारखंड विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांनी संपूर्ण ताकद पणाला लावूनही भाजपाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. सत्ता असलेले आणखी एक राज्य गमावण्याची पाळी भाजपावर आली आहे. या विधानसभा निवडणुकीसाठी मोदी-शहा यांनी घेतलेल्या सभा, प्रियंका-राहुल यांनी घेतलेल्या प्रचार आणि त्या तुलनेत दोन्ही पक्षांना मिळालेले यश म्हणजेच एकुण मतदान आणि जागा यांची मांडणी करून तुलन केली जात आहे. विशेष म्हणजे यासंबंधीची आकडेवारीसुद्धा मोठी रंजक आहे.

झारखंडमध्ये पाच टप्प्यांमध्ये मतदान झाले. या पाचही टप्प्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचारसभा घेतल्या. मोदींनी एकूण ९ सभा घेतल्या. गृहमंत्री अमित शहांनी मतदानाच्या तीन टप्प्यांमध्ये सभा घेतल्या. झारखंडमध्ये विधानसभेचे एकूण ८१ मतदारसंघ आहेत. मोदी आणि शहांनी प्रत्येकी ९ सभा घेत ६० मतदारसंघांमध्ये प्रचार केला. मात्र यातील ४० जागांवर भाजपाचा पराभव झाला. याचा अर्थ मोदी-शहांच्या सभांमुळे भाजपाला ३३.३३ टक्केच जागा जिंकता आल्या आहेत.

तर झारखंडमध्ये काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि महासचिव प्रियंका गांधी यांनी भाजपापेक्षा कमी म्हणजेच ६ सभा घेतल्या. त्यांनी २४ मतदारसंघांमध्ये प्रचार केला. यातील ८ जागा त्यांनी जिंकल्या. याचा अर्थ मोदी-शहांप्रमाणेच राहुल आणि प्रियंका यांनादेखील ३३.३३ टक्केच जागा जिंकता आल्या आहेत. यावरून मोदी-शहा आणि प्रियंका-राहुल यांची बरोबरी केली जात आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील अनुभव गाठीशी असल्याने काँग्रेसने झारखंडमध्ये निवडणुकीपूर्वीच झारखंड मुक्ती मोर्चा आणि राष्ट्रीय जनता दलासोबत आघाडी केल्याने त्याचाही फायदा काँग्रेसला येथे झाला आहे.

फेसबुक पेज लाईक कराhttps://www.facebook.com/policenama/