Coronaviurs : 16 मार्चला राजधानी एक्सप्रेसनं रांची पोहचली होती ‘कोरोना’ संक्रमित महिला

रांची : वृत्तसंस्था – झारखंडची राजधानी रांचीमध्ये कोरोना व्हायरसचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर राज्यात खळबळ उडाली असून पोलिसांनी रांचीच्या हिंदपिढी परिसराला सील करत कर्फ्यू लावला आहे. कोरोना संक्रमित महिला याच भागात थांबली होती. रिपोर्टनुसार, रांचीमध्ये मंगळवारी कोरोनाने संक्रमित आढळलेल्या मलेशियन धर्म प्रचारक तरुणीने १६ मार्चला नवी दिल्लीतून रांचीकडे येणाऱ्या राजधानी एक्सप्रेस ट्रेन के बी-१ बोगीमध्ये प्रवास केला होता.

प्रशासनाने राजधानी एक्सप्रेस या बोगीमध्ये प्रवास करणाऱ्या सगळ्या लोकांना संपर्क केला आणि आपली चाचणी करण्यास सांगितले. एका निवेदनात रांची उपायुक्त जिल्हाधिकारी राय महिमापत रे यांनी रांचीमधील लोकांना आवाहन केले की, जी व्यक्ती १६ मार्च २०२० ला दिल्लीतून राजधानी एक्सप्रेसच्या बी-१ कोचमध्ये प्रवास करून रांचीला आली आहे ते याबाबत जिल्हा प्रशासनाला सूचना देतील आणि आपली तपासणी करतील.

घर झाले सील, आसपासची लोकं क्वारंटाइन
कोरोना रुग्ण ज्या घरात थांबली होती त्या घराला सील केले गेले आहे. सोबतच ते घर आणि आसपासच्या लोकांना क्वारंटाइनसाठी RIMS ला पाठवले गेले आहे जिथे तपासणी सुरु आहे. याशिवाय ज्या-ज्या घरात मलेशिया येथून आलेले लोकं थांबले होते, त्या घरांना पोलीस-प्रशासनाची टीम चिन्हित करत आहे, जेणेकरून तेथील लोकांची तपासणी करता येईल. रिपोर्टनुसार, मलेशियन नागरिक जमातीचे काही जण रांचीच्या मक्का मस्जिद, मदिना मस्जिद आणि मोठ्या मस्जिद भागात राहिले आहेत.