काय सांगता ! होय, त्यानं नशेत चक्क गुप्तांगात टाकली मोबाईल चार्जरची तार

पोलिसनामा ऑनलाईन – नशेमध्ये असताना मद्यपी काय करतील याचा काहीच नेम नसतो. झारखंडमधल्या दुमका इथल्या एका नशेखोर तरुणाने गुप्तांगात मोबाईल चार्जरची तार टाकल्याची घटना घडली. डॉक्टरांनी ऑपरेशन करून ती तार काढली असून त्या युवकाचा जीव वाचला आहे. आनंदर कुमार असे तरुणाचे नाव आहे.

दुमका इथे राहाणारा आनंदरला दारुचे व्यसन आहे. दररोज दारु पिऊन तो बायकोला मारहाण करत होता. त्यामुळे त्रासामुळे त्याची बायको माहेरी निघून गेली. बायको सोडून गेल्याने तो अधिकच दारु पिऊ लागला. नशेत असताना त्याने मोबाईल चार्जरच्या वायरमधून तार काढली आणि ती गुप्तांगात टाकली. एक फुटभर वायर मध्ये गेली आणि युरिनरी ब्लॅडरमध्ये अटकली होती. त्यानंतर त्याने लोक लाजेस्तव ही घटना कुणालाच सांगितली नाही. नंतर त्याला त्रास व्हायला लागला. त्याची लघवीच बंद झाली. शेवटी त्याला डॉक्टरकडे घेऊन जावे लागले. तेव्हा त्याने सगळी घटना सांगितली. डॉक्टरांनी ऑपरेशन करून तार काढली. उशीर झाला असता तर इन्फेक्शन होऊन जीवही जाऊ शकला असता असे मत डॉक्टरांनी व्यक्त केले आहे.