झारखंडमध्ये मोठा नक्षलवादी हल्ला, अधिकाऱ्यासह ५ पोलीस शाहिद

झारखंड : पोलीसनामा ऑनलाईन – झारखंडमधील सरायकेला येथे नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या वाहनांवर गोळीबार करत हल्ला चढविला. या हल्ल्यात पाच पोलीस शहिद झाले. यामध्ये दोन सहाय्य्क पोलीस उपनिरीक्षक तर तीन पोलीस शिपायांचा समावेश आहे. हि घटना आज सायंकाळी उशिरा म्हणजे साडेसहाच्या सुमारास घडली.


पोलीस पथक या ठिकाणी गस्त घालून माघारी परतत होते. त्यावेळी आधीच दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी बेसावध असणाऱ्या जवानांवर बेछूट गोळीबार करत हल्ला केला. या हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात काही नक्षलवादी देखील जखमी झाल्याचे वृत्त आहे. या हल्ल्यानंतर शहिद पोलिसांकडील शस्त्रे घेऊन नक्षलवाद्यांनी घटनास्थळावरून पलायन केले.

मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी सरायकेला जिल्ह्यातील तिरूलडीह पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कुकडू येथे आठवडा बाजार असल्याने याठिकाणी पोलीस पथक गस्तीवर होत. तिकडून परतताना नक्षलवाद्यांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात पाच पोलीस जागीच शहीद झाले असून काही पोलीस जखमी असल्याचेही सांगण्यात आले.

अतिरिक्त पोलीस महासंचालक एम. एल. मीना यांच्याशी यासंदर्भात संपर्क साधला असता त्यांनी या वृत्तास दुजोरा दिला. जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले असून तात्काळ उपचार केले सुरु केल्याचे त्यांनी सांगितले.

याआधी झाली होती २ जून ला चकमक :
झारखंडमध्ये डुमका येथे गेल्या आठवड्यात रविवारी (2 जून) सीमा सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये जोरदार चकमक झाली होती. यावेळी चकमकीत चार ते पाच नक्षलवाद्यांचा खात्मा सुरक्षा दलाने केला होता. यामध्ये १ जवान शाहिद तर ४ जवान जखमी झाले होते.

आरोग्य विषयक वृत्त-
पावसाळ्यात आरोग्याची घ्या अशी काळजी
सावधान ! चायनीज फूड खाताय ? हे लक्षात असू द्या
पचनप्रणाली बिघडल्यास होऊ शकतो यकृतावर परिणाम