‘इथं’ लग्नाअगोदर जोडपे राहते ‘लिव्ह इन’मध्ये; त्याचं कारणही तसंच, 105 जोडप्यांनी केलं लग्न; वाचा प्रकार काय ?

नवी दिल्ली : भारतीय संस्कृतीत विवाहसंस्थेला विशेष महत्त्व आहे. लग्नानंतरच अनेक जोडपे एकत्र येतात. पण सध्याच्या वातावरणात जोडप्यांचं ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहणे काही प्रमाणात वाढत आहे. असे असतानाच झारखंडच्या खुंटी येथे अनेकजण लग्नाअगोदर ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहतात. त्यानंतर ते लग्न करतात.

सुदूर बिहडो हा समाज अति मागासवर्गापैकी एक आहे. या समाजातील जोडपे गरीब असल्याने ते लग्न करू शकत नव्हते. तसेच ते लग्न जरी केले तर त्यानंतरच्या लग्नसोहळ्यात जेवणाचे पैसे देण्यास असमर्थ होते. समाजात या लोकांना ‘ढुकू’च्या नावाने तिरस्कार केला जात होता. पण आता या लोकांना समाजाकडून न्याय दिला जात आहे. यातील 105 जोडपे विवाहबंधनात अडकले आहेत. या विवाहसोहळ्यात राज्यपाल द्रोपदी मूर्म आणि केंद्रीय सचिव एन. एन. सिन्हा हे ऑनलाईनच्या माध्यमातून जोडले गेले होते. त्यांनी या जोडप्यांना आशीर्वाद दिले. तसेच या विवाहसोहळ्यात डीसी, एसपींसह पूर्ण प्रशासकीय अधिकाऱ्यांचाही समावेश होता. हा विवाहसोहळा सरना धर्माच्या रितीरिवाजानुसार झाला.

राज्यपाल द्रोपदी मूर्मू यांनी ऑनलाईन माध्यमातून या लग्नसोहळ्यात उपस्थिती दर्शवली. त्यासह त्यांनी या सर्व जोडप्यांना सरकारी योजनांचा पर्याय उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. तसेच सिन्हा यांनी या जोडप्यांना स्वावलंबी बनवण्याची घोषणा केली.

…म्हणून राहतात ‘लिव्ह इन’मध्ये

जेव्हा हे जोडपे लग्न करते पण त्यांना समाजात लग्नाचे जेवण देण्यासाठी पैसे नसतात, ते असमर्थ असतात. त्यामुळे त्यांच्याकडे लग्नाविनाच लिव्ह-इनमध्ये राहण्याशिवाय पर्याय नसतो. त्यामुळेच त्यांच्यावर समाजातून टीका केली जाते. यातूनच त्यांना ढुकू नावाने संबोधले जाते. तसेच त्यांना सामाजिक कार्यात उपस्थित राहण्यास मज्जाव केला जातो.