धक्‍कादायक ! भाजपच्या मंत्र्याची मुस्लिम आमदारावर ‘जय श्रीराम’ बोलण्याची सक्ती

रांची : वृत्तसंस्था – झारखंडमधील भाजपचे एक मंत्री काँग्रेसच्या मुस्लिम आमदारावर जय श्रीराम घोषणा देण्यास दबाव आणत आहेत. ही घटना झारखंड विधानसभेच्या बाहेर घडली आणि पूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सीपी सिंह असे या मंत्र्याचे नाव आहे.

व्हिडिओमध्ये स्प्ष्टपणे दिसून येत आहे की, भाजपचे मंत्री सीपी सिंह काँग्रेसचे आमदार इरफान अन्सारी यांचा हात पकडून म्हणत आहेत. इरफान भाई तुम्ही जोरात जय श्रीरामची घोषणा द्या. सीपी सिंह एवढ्यावरच न थांबता म्हणाले की, तुमचे पूर्वज रामाचे होते, बाबरचे नव्हते. व्हिडिओमध्ये इरफान अन्सारी म्हणत आहेत की, तुम्ही लोक रामाच्या नावाचा वापर भीती दाखवण्यासाठी करत आहात. रामाच्या नावाला तुम्ही बदनाम करत आहात. या वेळी नोकरी, पाणी, वीज या विषयावर चर्चा केली पाहिजे. यावर सीपी सिंह म्हणाले की, मी तुम्हाला हे भीती दाखवण्यासाठी बोलत नाही. हे विसरू नका की तुमचे पूर्वज जय श्रीरामच्या घोषणा देत होते. तैमूर, बाबर, गजनी तुमचे पूर्वज नव्हते. तुमचे पूर्वज श्रीरामाला मानणारे होते.

सीपी सिंह झारखंडमधील भाजप सरकारमध्ये शहरी विकास व परिवहन मंत्री आहेत. या पूर्ण घटनेवर भाजप नेते म्हणत आहेत की, सीपी सिंह यांचे वाक्य चुकीच्या पद्धतीने मांडले जात आहे. झारखंडमध्ये गेल्याच महिन्यात तबरेज अन्सारी या मुस्लिम व्यक्तीला जमावाकडून मारहाण करण्यात आली होती. त्याच्यावर जय श्रीराम घोषणेची सक्ती करण्यात आली होती. या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडियात व्हायरल झाल्यामुळे देशभरात चांगलीच खळबळ माजली होती. हा मुद्दा संसदेत देखील गाजला होता. तबरेज अन्सारी मृत्यू प्रकरणात राज्य सरकारने एका तपास समिती नेमली होती. या समितीने या घटनेचा तपास करून पोलीस आणि डॉक्टरांना दोषी ठरवले होते.

आरोग्यविषयक वृत्त –