झारखंड Exit Poll : भाजपला ‘झटका’ तर JMM – काँग्रेसची ‘सरशी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – झारखंड विधानसभा निवडणुकीत भाजपाला मोठा धक्का बसू शकतो. पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदानानंतर आलेल्या एग्झिट पोलमध्ये भाजपा सत्तेच्या स्पर्धेत मागे पडत असल्याचे दिसत आहे. झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेस एकत्र येत येथे सरकार स्थापन करू शकतात. पोल ऑफ पोलनुसार ८१ सदस्यांच्या विधानसभेत हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होऊ शकते. जर असे झाले तर झारखंड हे महाराष्ट्रानंतर दुसरे राज्य असेल जिथे भाजपाच्या हातून सत्ता निसटलेली असेल.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला येथे ४४ जागा मिळाल्या होत्या. यानंतर रघुवर दास यांच्या नेतृत्वात राज्यात भाजपाचे सरकार स्थापन झाले होते. लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या महाराष्ट्र आणि हरयाणा निवडणुकीत भाजपा हरयाणात सत्ता वाचवू शकली, पण महाराष्ट्रात शिवसेनेने घेतलेल्या निर्णयामुळे भाजपाच्या हातून सत्ता निसटली.

आता झारखंडमधून जे संकेत मिळत आहेत, ते भाजपसाठी चांगले असल्याचे दिसत नाहीत. आज तक एक्सिस माय इंडियानुसार जेएमएम आणि काँग्रेसला ३१ ते ३९ जागा मिळू शकतात. तर भाजपाला २८ ते ३६ जागा मिळू शकतात. भाजपापासून विभक्त होत निवडणुक लढत असलेल्या आजसूला ३ ते ५ जागा मिळू शकतात.

आज तक एक्सिस माय इंडिया

भाजपा २२-३२
जेएमएम काँग्रेस ३८-५०
जेव्हीएम ०२-०४
आजसू ०३-०५
अन्‍य ०४-०७

कशिश न्‍यूज
भाजपा २५-३०
जेएमएम काँग्रेस ३७-४९
आजसू ०२-०४
अन्‍य ०२-०४

आयएएनएस एबीपी-सी व्होटर
भाजपा ३२
जेएमएम काँग्रेस ३५
आजसू ०५
अन्‍य ०९

भाजपाची रघुवरदास सरकार झारखंडचे पहिले पाच वर्ष चालणारे सरकार आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला ४४, जेएमएमला १६, काँग्रेसला ६ जागा मिळाल्या होत्या. आजसूला ३ आणि बाबूलाल मरांडी यांच्या जेव्हीएमला २ जागा मिळाल्या होत्या. यानंतर भाजपाने रघुवर दास यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केले होते. झारखंडच्या १९ वर्षांच्या इतिहास पाच वर्षे पूर्ण करणारे हे पहिले सरकार होते.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/