झारखंडमध्ये पुन्हा ‘मॉब लिंचिंग’, दोन ज्येष्ठ महिलांसह चौघांची हत्या

वृत्‍तसंस्था : पोलीसनामा ऑनलाइन – देशभरात जमावाकडून हिंसा होण्याच्या घटना पुन्हा-पुन्हा घडत आहेत. जमावाकडून हिंसाचार झाल्याची नुकतीच एक घटना झारखंडमध्ये घडली आहे. झारखंडच्या गुमला परिसरात डायन म्हणून एका ज्येष्ठ महिलेसह चौघांची लाठया-काठयांनी बेदम मारहाण करून हत्या करण्यात आली आहे. त्यामध्ये दोन ज्येष्ठ महिलांचा समावेश आहे. दरम्यान, त्यांच्या हत्येचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही.

फगनी देवी (65), चंपा भगत (65), सुना भगत (65) आणि पेटी भगत अशी हत्या झालेल्यांची नावे आहेत. रविवारच्या सकाळी चौघांच्या हत्येची घटना समोर आली आहे. गुलमाच्या शिकारी गावात ही घटना घडली आहे. याप्रकरणी 12 जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून रविवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास चौघांची हत्या करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांची घटनास्थळी भेट देवुन पाहणी केली.

अंधश्रध्देतून चौघांची हत्या
याप्रकरणी गुमलाचे पोलीस अधीक्षक अंजनी कुमार यांनी वक्‍तव्य केले आहे. ते म्हणाले, पिडीत जादुटोणा करण्यामध्ये सामिल असल्याचा प्राथमिक अंदाज असून अंधश्रध्देमुळे त्यांची हत्या झाल्याचे दिसून येते. प्रकरणाच्या सखोल तपासाचे आदेश देण्यात आले असून पोलिस अधिकारी तपास करत आहेत.

घरातून उचलून गावाबाहेर नेऊन हत्या
मिळालेल्या माहितीनुसार जवळपास 12 जणांची तोंडावर काळया रंगाचा नकाब परिधान करून गावात प्रवेश केला. चौघांना त्यांच्या घरातुन गावाबाहेर नेण्यात आले. तेथे त्यांच्यावर लाठया-काठयांनी हल्‍ला करण्यात आला. त्यामध्ये चौघांना मृत्यू झाला. प्रकरणाचा सखोल तपास चालु आहे. चौघांची हत्या झाल्यानंतर संपुर्ण गावात दहशतीचे वातावरण आहे.

केंद्र सरकारकडून घटनेची दखल
या घटनेची गृह मंत्रालयाने देखील गंभीर दखल घेतली आहे. मॉब लिंचिंगच्या घटनेची जबाबदारी राज्य सरकारवर असल्याचे यापुर्वी स्पष्ट करण्यात आले होते. उत्‍तरप्रदेशासह इतर राज्यात देखील मॉब लिंचिंगच्या अनेक घटना घडल्या आहेत. मॉब लिंचिंगवर अनेक राजकीय नेत्यांची वेगवेगळया भुमिका देखील मांडल्या आहेत. दरम्यान, झारखंडमध्ये झालेल्या या घटनेची गृहमंत्रालयाने अतिशय गंभीर दखल घेतल्याची माहिती समोर आली आहे.

आरोग्यविषयक वृत्त-