भाजपाला शिवसेनेनंतर आणखी एक मोठा ‘धक्का’ ! ‘या’ मित्र पक्षानं सोडली ‘साथ’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महाराष्ट्रात सत्तास्थापनेचा पेच सुटताना दिसून येत नसून शिवसेनेने राज्यामध्ये भाजपशी काडीमोड घेतला आहे. मुख्यमंत्रीपदावरून दोघांची अनेक वर्ष जुनी युती तुटली असून आता पुन्हा एका पक्षाने भाजपची साथ सोडली आहे.

काय आहे प्रकरण –

महाराष्ट्र आणि हरियानानंतर आता झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली असून सर्व पक्षाने याची जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यामुळे आता भाजपचा मित्रपक्ष असलेल्या लोक जनशक्ती पक्षानं मात्र झारखंडमध्ये स्वतंत्र लढण्याची घोषणा केली आहे. 81 जागांपैकी 50 जागांवर स्वतंत्र लढण्याची घोषणा त्यांनी केली आहे. पक्षाचे नेते रामविलास पासवान हे मोदी सरकारमध्ये मंत्री असून पक्षाचे अध्यक्ष आणि पासवान यांचे चिरंजीव चिराग पासवान यांनी झारखंडमध्ये मात्र स्वतंत्र लढण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे भाजपला याचा मोठा फटका झारखंडाध्ये बसू शकतो.

सध्याची राजकीय परिस्थिती ? –

सध्याच्या विधानसभेमध्ये भाजपकडे 37 जागा असून ऑल इंडिया झारखंड स्टुडंट्स युनियन आणि झारखंड विकास मोर्चा या तिघांनी मिळून सरकार स्थापन केले होते. तर झारखंड मुक्ती मोर्चाकडे 19 जागा आहेत. प्रमुख विरोधी पक्ष असल्याने यावेळी सत्ता मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे.

Visit : Policenama.com 

Loading...
You might also like