जिया खानच्या बहिणीचा साजिद खानबद्दल धक्कादायक खुलासा, म्हणाली – ‘स्क्रिप्ट वाचतानाच तिला टॉप आणि ब्रा काढायला सांगितलं’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – डायरेक्टर साजिद खान (Sajid Khan) वर आतापर्यंत अनेक मॉडेल आणि ॲक्ट्रेसनं लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले आहेत. दिवंगत ॲक्ट्रेस जिया खान (Jiah Khan) ची बहिण करिश्मा खान ( Karishma Khan) हिनं साजिदबद्दल धक्कादायक आणि चकित करणारे खुलासे केले आहेत.

‘साजिदनं तिला टॉप आणि ब्रा काढायला सांगितलं’
जिया खानच्या मृत्यूवर आधारीत एका मीडियाची डॉक्युमेंट्री डेथ इन बॉलिवूडमध्ये जियाची बहिण करिश्मानं सांगितलं की, रिहर्सल दरम्यान जिया तिची स्क्रिप्ट वाचत होती. तेव्हा साजिदनं तिला टॉप आणि ब्रा काढायला सांगितलं.

करिश्मानुसार, आधी तर तिच्या लक्षातच नाही की, तिनं काय करावं. ती म्हणालीही होती की, अजून सिनेमा सुरूही झाला नाही आणि हे सगळं होत आहे. घरी आल्यानंतर जिया खूपच रडली होती.

ते केस करून माझं नाव खराब करतील
करिश्मानं पुढं सांगितलं की, जियानं मला सांगितलं की, तिनं कॉन्ट्रॅक्ट साईन केलं आहे. जर तिनं सिनेमा सोडला तर ते तिच्यावर केस करतील आणि तिचं नाव खराब होईल.

करिश्मा म्हणते, जर ती सिनेमाचा भाग राहिली तर तिला सेक्शुअली हॅरॅस केलं जाणार होतं. ही खूप वाईट स्थिती होती. अशात तिला हा सिनेमा करावा लागला होता. इतकंच नाही तर साजिदनं त्याच्या घरी जियासोबत गैरवर्तन केलं होतं.

साजिदनं केली होती घाणरेडी कमेंट
करिश्मानं सांगितल्यानुसार, ती जिया खान सोबत साजिदच्या घरी गेली होती. जिया सांगते की, मी किचन टेबलपाशी बसले होते. मी स्ट्रॅपी टॉप घातला होता. मी वाकून बसले होते. साजिदनं मला पाहून म्हटलं की, ओह हिला शीरीरिक संबंध ठेवायचे आहेत. त्यावेळी माझं वय 16 वर्षे असेल. माझी बहिण म्हणाली की, हे काय बोलताय तुम्ही ती लहान निष्पाप मुलगी आहे.