19 व्या वर्षी ‘बिग बी’ अमिताभसोबत ‘डेब्यू’, 25 व्या वर्षी ‘असं’ संपवलं तिनं आयुष्य

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – चित्रपटसृष्टीत नाव कमविण्यासाठी बरीच धडपड करावी लागते, त्यात मिळालेल्या संधीच सोनं करणं आणि अल्पावधीतच चाहत्यांच्या मनात घर करणं हे फार कमी जणांना जमतं. याचेच मोठे उदाहरण म्हणजे अभिनेत्री जिया खान. जिचा आज 32 वा वाढदिवस आहे. एक अशी अभिनेत्री जिने तिच्या कारकीर्दीत प्रत्येक गोष्ट साध्य केली, यश मिळवले, प्रसिद्धी मिळाली आणि लोकांकडून खूप प्रेमदेखील मिळवले. मात्र, तरीही असे काहीतरी होते जे जगापासून नेहमी लपून राहिले, ज्यामुळे 3 जून 2013 रोजी जियाने गळफास घेत आत्महत्या केली. वयाच्या 25 व्या वर्षी या अभिनेत्रीने आत्महत्येचे पाऊल उचलले. आपल्या आयुष्याच्या कमी कालावधीत जिया खानने अनेक यशस्वी टप्पे पार केले, मोठे यश मिळविले ज्याची कलाकार स्वप्न पाहतात.

19 साल की उम्र में अमिताभ संग डेब्यू, 25 में मौत, यूं खत्म हुई जिया की जिंदगी

20 फेब्रुवारी 1988 रोजी जिया खानचा जन्म न्यूयॉर्कमध्ये झाला होता. तिचा जन्म भारतात झाला नव्हता मात्र तिचा कल नेहमीच बॉलिवूडकडे होता. जिया खानची आई राबिया अमीन बॉलिवूडमधील एक नामांकित अभिनेत्री असल्याने, जियाचे मनदेखील अभिनयाकडे लागले होते. स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने चित्रपट अभिनय आणि इंग्रजी साहित्यातही शिक्षण घेतले. जिया खानच्या फिल्मी करिअरची सुरुवात इथूनच झाली.

19 साल की उम्र में अमिताभ संग डेब्यू, 25 में मौत, यूं खत्म हुई जिया की जिंदगी

2007 मध्ये जिया खानला बॉलिवूडमध्ये आपली एक ओळख निर्माण करण्याची संधी मिळाली. राम गोपाल वर्माच्या ‘निशब्द’ चित्रपटातून तिने सिनेसृष्टीत पदार्पण केले. पण जियासाठी हा सामान्य चित्रपटही खास ठरला, कारण तो शतकातील महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत होता. अमिताभ बच्चन यांच्या डेब्यू चित्रपटामुळे जिया खानच्या कारकीर्दीला जबरदस्त सुरुवात झाली. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे खूप कौतुक केले गेले होते आणि तिला फिल्मफेअरमधील सर्वोत्कृष्ट पदार्पणासाठी देखील नामांकन देण्यात आले होते.

19 साल की उम्र में अमिताभ संग डेब्यू, 25 में मौत, यूं खत्म हुई जिया की जिंदगी

जिया खानच्या टॅलेंटचा अंदाज आपण इथूनच लावू शकतो कि, अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम केल्यानंतर तिला बॉलीवूडच्या मिस्टर परफेक्शनिस्ट बरोबरही चित्रपटाची संधी मिळाली. जियाने आमिर खानसोबत 2008 मध्ये ‘गजनी’ या ब्लॉकबस्टर फिल्ममध्ये काम केले होते. या चित्रपटातूनही तिला भरगोस प्रसिद्धी मिळाली. यानंतर जिया खानने कॉमेडी चित्रपटातही काम केले. साजिद खान दिग्दर्शित ‘हाऊसफुल’ या चित्रपटात तिने अक्षय कुमारसोबत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर भरगोस कामे केली, जियानेही अभिनयानेही सर्वांचे लक्ष वेधून घेतले. हाऊसफुलमध्ये काम करून जियाने हे सिद्ध केले होते की, ती प्रत्येक शैलीचा चित्रपट चांगल्या प्रकारे करू शकते.

19 साल की उम्र में अमिताभ संग डेब्यू, 25 में मौत, यूं खत्म हुई जिया की जिंदगी

अभिनयाबरोबरच जीया एक प्रशिक्षित गायक आणि नर्तकही होती. तिच्या टॅलेंटचे कौतुक करण्यापूर्वी तिने जग सोडले. जिया खानने 3 जून 2013 रोजी आत्महत्या केली. पण ती आत्महत्या असो की हत्या, नेहमीच सस्पेन्स ठेवला जात असे. कारण जिया खान सुसाइड नोट लिहून गेली होती.

19 साल की उम्र में अमिताभ संग डेब्यू, 25 में मौत, यूं खत्म हुई जिया की जिंदगी

सुसाईड नोटमध्ये जिया खानने लिहिले आहे की, ‘तुला कसे सांगू हे माहित नाही, परंतु आता मी सांगू शकते, कारण आता हरवण्यासारखे काही शिल्लक नाही. मी आधीच सर्व काही गमावले आहे. तू हे वाचत असशील तेव्हा मी एकतर हे जग सोडले असेल किंवा जाणार असले. मी तुटले आहे. तुला कदाचित हे कळले नसेल, परंतु तू मला फार अफेक्ट केले आहे, इतके की मी तुमच्या प्रेमात खोलवर गुंतले. तरीही तू रोज माझा छळ केलास’.

19 साल की उम्र में अमिताभ संग डेब्यू, 25 में मौत, यूं खत्म हुई जिया की जिंदगी

दरम्यान, जिया खान अभिनेता सूरज पंचोलीची प्रेयसी होती. त्यामुळे सुसाइट नोट समोर येताच संशयाची सुई सूरजकडे गेली आणि पोलिसांनी त्याला अटक केली आणि तुरूंगात टाकले. पण नंतर सूरजला जामीन मिळाला आणि आता हे प्रकरण कोर्टात प्रलंबित आहे. जियाच्या आईने सूरजवर बरेच आरोप केले होते, परंतु सूरजने नेहमीच निर्दोष असल्याचा दावा केला. आता जिया खानने आत्महत्या केली कि तिची हत्या करण्यात आली, हे आजही एक रहस्य आहे.