जियाच्या आईनं केली CBI चौकशीची मागणी, म्हणाल्या – ‘माझ्या मुलीप्रमाणेच सुशांतलाही मारलं गेलं’

मुंबई, पोलीसनामा ऑनलाईन : सुशांतसिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलिसांच्या तपासाबाबत असमाधानी कुटुंबियांनी सीबीआय चौकशीची मागणी केली. आता बॉलिवूड अभिनेत्री जिया खानची आई राबिया खान यांनीही सीबीआयच्या तपासाला पाठिंबा दर्शविला आहे. त्या म्हणाल्या की, ज्याप्रमाणे त्यांच्या मुलीच्या मृत्यूला आत्महत्येचे स्वरूप देण्यात आले होते तसेच सुशांतच्या बाबतीतही घडले आहे. त्यांनी मुलीच्या आत्महत्येला हत्या असल्याचे म्हटले, ज्यासाठी तिला भडकवले गेले होते. राबिया खान यांनी सीबीआयच्या तपासासंदर्भात हे पोस्ट शेअर केले आहे.

जियाच्या आईचे म्हणणे आहे की, सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूला सुसाइडचे नाव दिले जात आहे, त्याच प्रकारे त्यांच्या मुलीचीही हत्या करण्यात आली. सीबीआयने या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्याची मागणी राबिया खान यांनी केली आहे. पोलिसांच्या राजकीय दबावामुळे सत्य उघड होणार नाही, असे त्यांनी पोस्टच्या माध्यमातून सांगितले.

सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये जियाच्या आईने लिहिले आहे- ‘जिया खानप्रमाणेच सुशांत सिंह यांना मारण्यात आले आणि मला यापूर्वी कधीही अश्याप्रकारे असहाय आणि दुःखी वाटले नाही. सुशांत आणि जीया दोघांनाही प्रथम चुकीच अटेंशन आणि प्रेम दिले गेले. जेव्हा दोघांना नार्स‍िस्टि साइकोपॅथ‍िक गॅस लाइटिंग पार्टनरच्या जाळ्यात अडकवले गेले तेव्हा त्यांना शारीरिक इजा व अत्याचार केले गेले. दोघांचा पैशासाठी वापर केला गेेला आणि कुुटूूंबापासून दूर केेलेेे गेले. जिया आणि सुशांत दोघांना मानसिकरित्या डिसेबल असल्याचे म्हणचे काम नसल्याने डिप्रेस्ड घोषित करण्यात आले. जेव्हा पार्टनरचा ताबा सुटला, तेव्हा त्यांच्या होमिसाइडल डेथला आत्महत्या म्हटले गेले.

जिया खान आणि सुशांतचे नरसिस्टीक क्रिमिनल पार्टनर ताकदवान बॉलिवूड माफिया आणि नेत्यांशी संबंधित आहेत, म्हणूनच त्यांनी त्यांची मदत घेतली, कारण त्यांना माहित आहे की, या बॉलिवूड माफियांना आणि राजकारण्यांना गुन्हेगारांचे वर्तन जाणून घेण्याची ताकद आहे. राजकीय दबावामुळे पोलिस सत्य समोर आणू शकत नाहीत. त्यांनी आपला संपूर्ण वेळ पुरावा नष्ट करण्यासाठी आणि या होमिसाइडल डेथला आत्महत्या म्हणून घोषित करण्यात वाया घालवला. त्यांच्या कथांना सपोर्ट देण्यासाठी ते बॉलिवूड माफिया आणि त्याच्या सिंडिकेट माध्यमांचा अवलंब करतात आणि डिप्रेशन स्टोरी सांगण्यासाठी महेश भट्टचा वापर करतात.

‘लोकांच्या मनात शंका निर्माण करण्यासाठी हे गुन्हेगार पीडित व्यक्तीच्या कुटुंबावर पैशाच्या लोभाने चुकीचे संस्कार, पर्सनल रेपुटेशन सारख्या आरोपाने हल्ला करतात. सीबीआयने या प्रकरणांच्या तळाशी जाऊन या गुन्हेगारांचा शोध घ्यावा. अन्यथा, ते अधिक क्रूर होतील आणि त्यांची दुष्कर्म करत राहतील आणि जिया-सुशांतप्रमाणेच, इतर निरपराध लोकांना ठार मारतील. कोणत्याही घटनेत नेते, पोलिस आणि बॉलिवूड माफिया गुन्हेगारांना संरक्षण प्रदान केली जाते आणि पीडित कुटुंबियांना भीतीच्या छायेत राहण्यास भाग पाडले जाते. अशा गुन्ह्यांचा अंत झाला पाहिजे ‘.

जियाच्या प्रियकरावर होता आरोप

दरम्यान, सात वर्षांपूर्वी 3 जून 2013 रोजी जिया खानने आपल्या फ्लॅटमध्ये गळफास लावून आत्महत्या केली. या प्रकरणात जिआचा प्रियकर अभिनेता सूरज पंचोली याचे नाव समोर आले आहे. सूरज पंचोलीने आपल्या मुलीची हत्या केली असून आत्महत्येचे नाव घेत असल्याचा आरोप जियाच्या आईने केला होता. दरम्यान सीबीआयने जिया खानच्या मृत्यूची चौकशी केली असून ही चौकशी अद्याप सुरू आहे, यासाठी सूरज पंचोली अनेक वेळा सुनावणीस गेला आहे.