जिजामाता प्राथमिक शाळेत तंबाखू मतलब खल्लास पोस्टर स्पर्धेचे आयोजन

लासलगांव : पोलीसनामा ऑनलाइन – लासलगाव येथील शिक्षण सहायक मंडळ संचलित आय.एस.ओ.मानांकित जिजामाता प्राथमिक शाळेत शिक्षण विभाग नाशिक तसेच सलाम मुबंई फाऊंडेशन तसेच एव्हरेस्ट फांऊंडेशन आयोजित तंबाखू मुक्त पोष्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. शालेय परिपाठात मुलांना शाळेचे मुख्याध्यापक अनिस काझी यांनी स्पर्धेची माहिती दिली. तंबाखूमुळे तसेच धुम्रपानामुळे होणारे विविध आजार, मानवी जिवनावर होऩारे परिणाम, तंबाखूची नशा करी जिवनाची दुर्दशा, तंबाखू बनवतो हिरोला झिरो, तंबाखु मुक्तआरोग्य संपन्न शाळा तसेच इतर विषयांवर आधारीत मुलांनी छान पोष्टर रंगवुन चित्रातुन तंबाखू व इतर गोष्टींचे सेवन करु नका. हा संदेश या माध्यमातून दिला.

याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब पाटील, सचिव संजय पाटील, उपाध्यक्ष निवृत्ती गायकर संचालक शंतनु पाटील, पं.सं.सदस्या रंजनाताई पाटील, संचालिका नीताताई पाटील व सर्व संचालक मंडळ व संस्थेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी वैष्णवीताई यांनी विद्यार्थ्यांच्या पोस्टरचे निरीक्षण करुन विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

स्पर्धा यशस्वीतेसाठी कैलास भामरे, सुहास बच्छाव, दिलीप शिरसाठ, समीर देवडे, राजाराम जाधव, केदुबाई गवळी योगिराज महाले, हर्षदा बच्छाव, बद्रीप्रसाद वाबळे बाळासाहेब वाजे यांनी परिश्रम घेतले.