Kisan Aandolan : शेतकऱ्यांनी PM मोदींना लिहिले रक्ताने पत्र; म्हटले – ‘काळा कायदा मागे घ्या’

जिंद : वृत्तसंस्था – कृषी कायद्यांविरोधात गेल्या काही महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. त्यामध्ये सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांकडून सर्वच प्रकारे प्रयत्न केले जात आहेत. त्यानंतर आता हरियाणातील जिंद भागातील शेतकऱ्यांनी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रक्ताने पत्र लिहून हा कृषी कायदा मागे घ्यावा आणि एमएसपी (MSP) लागू करावी, अशी मागणी केली.

जिंदच्या टोल नाक्यावर केंद्र सरकारच्या कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या शेकडो शेतकऱ्यांनी इंजेक्शनच्या माध्यमातून रक्त काढून पंतप्रधान मोदींना पत्र लिहिले. यामध्ये शेतकऱ्यांनी लिहिले, की ‘आदरणीय प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी जी, हमें तीनों काले कानून नहीं चाहिए. इन तीनों काले कानूनों को वापिस लो और एमएसपी पर परमानेंट कानून बनाओ. (आदरणीय पंतप्रधानजी, आम्हाला तीन काळा कायदा नको. याव्यतिरिक्त सरकारने एमएसपीवर स्थायी कायदा बनवावा.)

जिंद टोल नाक्यावर बसलेल्या शेतकऱ्यांनी सांगितले, की ते 63 पेक्षा जास्त दिवसांपासून कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत आहे. तरीही कोणतीही सुनावणी केली जात नाही. त्यामुळे तरुण शेतकऱ्यांनी पंतप्रधानला रक्ताने पत्र लिहिण्याचा निर्णय घेतला आहे.

भगतसिंह यांच्यासारखे रक्तही देणार
शेतकऱ्यांचे म्हणणे आहे, की आम्ही रक्ताने पत्र लिहून पंतप्रधान मोदी यांना संदेश लिहून देत आहोत. जे शेतकरी गांधीवादी पद्धतीने आंदोलन करतात, ते भगतसिंह यांच्यासारखे रक्तही देऊ शकतात.