काँग्रेसच्या ‘त्या’ प्रसिद्ध प्रवक्त्याची पराभवाकडे वाटचाल

जिंद : हरियाणा वृत्तसंस्था – हरियाणा विधानसभेच्या जिंद या मतदारसंघात पोट निवडणूक घेण्यात आली आहे. यात काँग्रेसचे प्रसिद्ध प्रवक्ते रणदीप सुरजेवाला सध्या पिछाडीवर असल्याचे समजते आहे. एवढेच नव्हे तर सुरजेवाला सध्या चौथ्या स्थानावर असल्याने त्यांच्या विजयाची खात्री देणे शक्य नाही. सुरजेवाला यांचे प्रतिस्पर्धी दिग्विजय चौटाला हे सध्या जिंद मतदारासंघातून आघाडीवर आहेत. ते जननायक जनता पार्टी या स्थानिक पक्षाचे उमेदवार आहेत.

तर तिकडे राजस्थानमध्ये रामगड मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार साफिया जुबेर खान यांनी भाजपच्या सुखवंत सिंह आणि बसपाच्या जगत सिंह या दोन्ही उमेदवारांवर आघाडी घेतली आहे. साफिया जुबेर खान या ९७७३ मतांनी आघाडीवर आहेत. या दोन्ही मतदारसंघाची निवडणूक भाजप सहित काँग्रेसने प्रतिष्ठेची बनवली होती. त्यात काँग्रेसचे प्रवक्ते पराभवा कडे झुकल्याने त्यांच्या पराभवाने काँग्रेसला चिंतीत केले आहे.

‘नथुरामने महात्मा संपवला, नरेंद्र मोदींनी लोकशीही संपवण्याचा विडा उचललाय’

या दोन मतदारसंघापैकी हरयाणातील जिंद हा मतदारसंघ फारच चर्चेत राहिलेला मतदारसंघ आहे. त्या मतदारसंघात काँग्रेसचे प्रवक्ते निवडणुकीच्या रणांगणात आल्याने भाजपने त्यांच्या पराभवाचा पुरेपूर प्रयत्न केला होता. २८ जानेवारी रोजी या ठिकाणी मतदान नोंदवून घेण्यात आले. त्या मतदारसंघात ७६ टक्के मतदान झाले होते. काँग्रेस, इंडियन नॅशनल लोकदल (आयएनएलडी) आणि जननायक जनता पार्टी या तीन पक्षात जिंद मतदारसंघामध्ये मुख्य लढत आहे. आयएनएलडी पार्टीचे आमदार हरिचंद मिड्ढा यांचे ऑगस्ट २०१८ मध्ये निधन झाल्याने त्या ठिकाणी पोट निवडणूक होत आहे. भाजपाने हरिचंद मिड्ढा यांचा मुलगा कृष्णा मिड्ढाला यांना उमेदवारी देऊन सुरजेवाला यांना शह देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र भाजपचा हि उमेदवार मागे चालतो आहे.