दर महिन्याला रिचार्ज करण्याचे टेन्शन संपले! ‘हे’ आहेत Jio-Airtel-Vi-BSNL चे सर्वात स्वस्त प्लान जे देतात 365 दिवसांची वैधता

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Jio-Airtel-Vi-BSNL | जर तुम्हाला असा मोबाइल रिचार्ज प्लान हवा असेल जो लाँग टर्म व्हॅलिडिटीसह यावा तर आम्ही तुम्हाला Jio, Airtel, Vi, BSNL च्या सर्वात स्वस्त प्लानची माहिती देत आहोत जे 365 दिवसांच्या वैधतेसह येतात. यामध्ये डेटा, कॉलिंग, एसएमएस सारखे इतर फायदेही देण्यात आले आहेत. हे प्लान जाणून घेऊया.

 

1. Airtel च्या रु. 1,799 च्या प्लॅनच्या डिटेल्स :
याची वैधता 365 दिवस आहे. यामध्ये यूजर्सना कोणत्याही नंबरवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जात आहे. यासोबतच 3600 एसएमएसही दिले जात आहेत. तसेच 24जीबी इंटरनेट डेटा दिला जात आहे. डेटा संपल्यावर 50 पैसे/एमबी शुल्क आकारले जाईल. याव्यतिरिक्त, एअरटेल यूजर्सना 30 दिवसांचे अमेझॉन प्राईम व्हिडिओ मोबाइल सबस्क्रिप्शन ऑफर करत आहे. त्याचबरोबर तीन महिने मोफत अपोलो 24/7 सर्कल, शॉ अकादमीमध्ये मोफत अ‍ॅक्सेस, फास्टटॅगवर 100 रुपये कॅशबॅक, मोफत Hello Tunes सुविधा दिली जाईल. याशिवाय विंक म्युझिकचे सबस्क्रिप्शन दिले जात आहे. (Jio-Airtel-Vi-BSNL)

 

2. Vodafone Idea च्या 1,799 रुपयांच्या प्लानचे डिटेल्स :
यामध्ये 365 दिवसांची वैधता दिली जात असून 24 जीबी डेटाही दिला जात आहे. डेटा संपल्यानंतर, यूजर्सना 64 केबीपीएस स्पीड दिला जाईल. याशिवाय सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधाही दिली जात आहे. याशिवाय 3600 एसएमएस सुविधा देण्यात येत आहे. इतर फायद्यांबद्दल बोलायचे झाल्यास, यूजर्सना Movies, TV अ‍ॅपमध्ये अ‍ॅक्सेस दिला जाईल.

3. Jio च्या 1,599 रुपयांच्या प्लॅनचे डिएल्स :
असेच काही प्लान जिओ यूजर्सनाही दिले जात आहेत, यामध्ये यूजर्सना अमर्यादित व्हॉइस कॉलिंग, 3600 पर्यंत फ्री आउटगोइंग एसएमएससह 24जीबी हाय-स्पीड इंटरनेट डेटा दिला जात आहे. डेटा संपल्यावर, स्पीड 64केबीपीएस पर्यंत राहतो. याव्यतिरिक्त, JioTV, JioCinema, JioSecurity, JioCloud सारखे अ‍ॅप्स दिले जात आहेत. त्याची वैधता 336 दिवस आहे.

 

4. BSNL च्या 1,499 रुपयांच्या प्लॅनचे डिटेल्स :
त्याची वैधता 336 दिवस आहे. यामध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा दिली जाईल. तसेच 24जीबी डेटा उपलब्ध करून दिला जातो. त्याच वेळी, दररोज 100 एसएमएसची सुविधा दिली जात आहे.

 

Web Title :-  Jio-Airtel-Vi-BSNL | jio airtel vi bsnl cheapest annual recharge plans check benefits

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Cholesterol Lowering Drinks | ‘या’ 4 नॅचरल ड्रिंक्सच्या मदतीने कमी होईल कोलेस्ट्रॉल, रोज प्यायची सवय करा

 

CM Eknath Shinde | संजय राऊतांना एकनाथ शिंदेंचा टोला, म्हणाले – ‘त्यांना स्वप्नातच…’

 

Pune Police | पुणे शहर पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्याची राहत्या घरी आत्महत्या; प्रचंड खळबळ